आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवेंट्सचा सलग चाैथा विजय:यजमान मिलान संघाचा पराभव

तुरीन5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आद्रियन रेबियाेट (५२ वा मि.) आणि निकाेलाे फागिआेलीने (८४ वा मि.) युवेंट्स फुटबाॅल संघाला इटालियन लीगमध्ये एकतर्फी विजय मिळवून दिला. युवेंट्स संघाने लीगमधील आपल्या १३ व्या सामन्यामध्ये यजमान एसी मिलानला धूळ चारली. युवेंट्स संघाने २-० ने सामना जिंकला. यासह या संघाला लीगमध्ये सलग चाैथा विजय साजरा करता आला. तसेच युवेंट्स संघाचा १३ सामन्यांतील हा सातवा विजय ठरला. दुसरीकडे लाेजिआे संघाने रंगतदार लढतीत १-० ने राेमाचा पराभव केला. यादरम्यान राेमा संघाला शेवटपर्यंत एकही गाेल करता आला नाही. यातून लाेजिआे संघाने १३ सामन्यांत आठवा विजय आपल्या नावे नाेंद केला.

बातम्या आणखी आहेत...