आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा विश्वचषक:केन पेनल्टीत अपयशी; इंग्लंडची संधी हुकली; फ्रान्स उपांत्य फेरीत

दाेहा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार हॅरी केन पेनल्टीमध्ये गाेल करण्यात अपयशी ठरल्याने इंग्लंंड संघाची फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची संधी हुकली. गत चॅम्पियन फ्रान्स संघाने रंगतदार उपांत्यपूर्व सामन्यामध्ये हॅरी केनच्या इंग्लंड संघाला धूळ चारली. एमबापेच्या फ्रान्स संघाने २-१ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला. ट्यूमेनी (१७ वा मि.) आणि जिरू (७८ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करत फ्रान्स संघाचा अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. यासह फ्रान्स संघाने आपली विजयी माेहीम कायम ठेवताना सातव्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. दरम्यान इंग्लंड संघाला करिअरमध्ये सातव्यांदा वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

फ्रान्सविरुद्धच्या पराभवाने मिळाली शिकवण : केन गत चॅम्पियन फ्रान्स संघाविरुद्धच्या पराभवाने आम्हाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. मात्र, याच पराभवाने आता आम्ही बऱ्याच ठिकाणी कमी पडल्याचेही दिसून आले. आता हीच दुबळी बाजू दूर करण्यावर आम्ही भर देणार आहाेत. यातून निश्चितपणे आम्हाला पुढच्या विश्वचषकात सर्वाेत्तम कामगिरी करता येईल, असा विश्वास कर्णधार हॅरी केनने व्यक्त केला.

काेच साऊथगेटसाेबतच्या चर्चेतून पुढील निर्णय; खांदेपालटाचे संकेत इंग्लंडला लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले. यातून आता इंग्लंड फुटबाॅल महासंघ लवकरच संघाचे प्रशिक्षक साउथगेट यांच्यासाेबत सखाेल चर्चा करणार आहे. त्यानंतर आगामी काळातील डावपेचाबाबतचा निर्णय घेतला जाईल. साऊथगेट हे २०१६ पासून प्रशिक्षकपदी आहेत.

बातम्या आणखी आहेत...