आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ला महागात पडला:पेनल्टीदरम्यान केनचा वेगवान चेंडू भरकटला : ह्युगाे लाॅरिस

पॅरिस4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला दुसऱ्या पेनल्टीदरम्यान जाेराची किक मारण्यासाठीचा सल्ला देण्यात आला हाेता. मात्र, त्याला हाच सल्ला महागात पडला. कारण, यादरम्यान जाेराने किक मारल्याने त्याचा चेंडू हवेतच भरकटला. यातून त्याचा पेनल्टी गाेलचा प्रयत्न अपयशी ठरला, अशा शब्दांत फ्रान्स संघाच्या गाेलरक्षक ह्युगाे लाॅरिन्सने प्रतिक्रिया दिली. लाॅरिन्स आणि केन हे दाेघेही इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये एकाच क्लबकडून खेळतात. हे दाेघेही टाॅटेनहॅमसाेबत करारबद्ध झालेले आहेत. इंग्लंडला केनच्या याच अपयशी पेनल्टीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यातून गत चॅम्पियन फ्रान्स संघाला उपांत्य फेरीचा पल्ला गाठता आला. पराभवामुळे इंग्लंड संघाचे आव्हान संपुष्टात आले.

बातम्या आणखी आहेत...