आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Kapil Dev On Sachin Tendulkar Batting Performance And His Double And Triple Hundreds

सचिनच्या क्षमतेवर प्रश्न:'तेंडुलकरला शतक मारता येत होते, पण डबल आणि ट्रिपल सेंचुरी झळकवता येत नव्हते'- कपिल देव

स्पोर्ट डेस्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देवने सचिन तेंडुलकरच्या कसोटी सामन्यात जास्त शतक न झळकवण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. कपिल म्हणाले की, तेंडुलकरला शतक मारता येत होते, पण डबल आणि ट्रिपल सेंचुरी झळकवता येत नव्हते.' महिला क्रिकेट टीमचे हेड कोच डब्ल्यू वी रमन यांच्यासोबत झालेल्या इंटरव्ह्यूदरम्यान कपिल यांनी वक्तव्य केले आहे.

सचिनने वीरेंद्र सेहवाग, जावेद मियांदाद, रिकी पोंटिंग, युनूस खान आणि मर्वन अट्टापट्टूप्रमाणे टेस्टमध्ये 6 दुहेरी शतक झळकावले आहेत. परंतू, टेस्टमध्ये सर्वाधिक शतक मारण्यात सचिन 12 व्या नंबरवर आहे. सचिनने 200 टेस्टमध्ये 6 दुहेरी शतक झळकावले आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रैडमेन 12 दुहेरी शतक मारुन पहिल्या नंबरवर आहेत.

सचिनने टेस्टमध्ये कमीत-कमी 5 ट्रिपल सेंचुरी मारायला हवी होती- कपिल

कपिल पुढे म्हणाले की, सचिनमध्ये फास्ट आणि स्पिन गोलंदाजीवर प्रत्येक ओव्हरमध्ये एकतरी बाउंड्री मारण्याची क्षमता आहे. त्यामुळे सचिनने टेस्टमध्ये कमीत-कमी 5 ट्रिपल आणि 10 डबल सेंचूरी मारयला हव्या होत्या. परंतू, सचिन टेस्टमध्ये एकही ट्रिपल सेंचूरी मारू शकला नाही.

सचिनने 1999 मध्ये पहिली डबल सेंचूरी मारली होती

सचिनने टेस्टमध्ये सर्वाधिक 51 शतक झळकावले आहेत. पहिली डबल सेंचूरी मारण्यासाठी सचिनला दहा वर्षे लागले. सचिनने 1999 मध्ये न्यूजीलंडविरुद्ध हैदराबादमध्ये पहिली डबल सेंचूरी मारली होती. सचिनच्या 51 शतकांपैकी फक्त 20 असे आहेत, ज्यात 150 पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये डबल सेंचूरी करणारा पहिला फलंदाज

सचिनने 2010 मध्ये दक्षिण आफ्रीकेविरोधात पहिली डबल सेंचुरी मारली होती. वन-डेमध्ये डबल सेंचुरी मारणारा सचिन पहिला फलंदाज आहे. सचिनने 2013 मध्ये निवृत्ती घेतली.