आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायजमान छत्रपती संभाजीनगर संघाच्या युवा कर्णधार हरिओम काळे (५१) आणि गाेलंदाज ऋषिकेश कुंडे (३/३६), श्रीनिवास लेहेकरने (२/३८) साेमवारी घरच्या मैदानावर एमसीए १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत परभणी संघाविरुद्ध सर्वाेत्तम खेळी केली. याच बळावर यजमान संघाने पहिल्या डावात गरवारे स्टेडियमवर १५७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात परभणी संघाची दिवसअखेर दमछाक झाली. संघाला पहिल्या डावात दिवसअखेर ३५ षटकांत पाच गड्यांच्या माेबदल्यात १२० धावा काढता आल्या. अद्याप ३७ धावांनी पिछाडीवर असलेल्या परभणी संघाचा आकाश विश्वकर्मा (१५) आणि पवन भांडाेरे (२०) मैदानावर कायम आहे. यजमान छत्रपती संभाजीनगरच्या युवा गाेलंदाज ऋषिकेश आणि श्रीनिवासने शानदार खेळीतून परभणीचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. परभणी संघाचा कर्णधार साैरभ शिंदे शून्यावर बाद झाला. संघाकडून क्षितिजने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकून यजमान छत्रपती संभाजीनगर संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यादरम्यान संघाची निराशाजनक सुुरुवात झाली. राम राठाेड (३) व सिद्धांत (०) झटपट बाद झाले. सलामीवीर ओंकारने २५ धावांचे याेगदान दिले.
दाेन्ही संघांचे कर्णधार चमकले : गरवारे स्टेडियमवर यजमान छत्रपती संभाजीनगर व परभणी या दाेन्ही संघाचे कर्णधार चमकले. यजमान संघाच्या कर्णधार हरिओमने अर्धशतक झळकावले. त्याने ५० चेंडूंत ८ चाैकार व १ षटकारासह ५१ धावा काढल्या. तसेच परभणीच्या कर्णधार साैरभ शिंदेने १९.२ षटकांत ३५ धावा देत ४ बळी घेतले. यात ६ निर्धाव षटकांचाही समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.