आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात टायटन्स (जीटी विरुद्ध आरसीबी) कडून पराभूत झाल्यानंतर बंगळुरू संघ आयपीएल प्ले ऑफमधून बाहेर पडला. पुन्हा एकदा विराट कोहलीचे आयपीएल विजेतेपदाचे स्वप्न प्लेऑफमधून बाहेर पडल्याने भंगले.
गेल्या 15 वर्षांपासून कोहलीची टीम म्हणजेच आरसीबी आयपीएल विजेतेपद मिळवू शकलेली नाही. आता पुन्हा एकदा आरसीबी संघ आणि विराटचे स्वप्न भंगले आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू केविन पीटरसनने एक खास ट्विट केले. ज्याची चर्चा आता होऊ लागली आहे. पीटरसनने पुन्हा एकदा ट्विट करून कोहलीला सल्ला दिला आहे.
पीटरसनने ट्विट करून लिहिले की, 'आता विराटला आरसीबी सोडून कॅपिटल्स संघात जाण्याची वेळ आली आहे. इंग्लंडचे माजी दिग्गज आणि समालोचक पीटरसनचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. यावर चाहत्यांनी देखील जोरदार कमेंट केली आहे.
विजेतेपद मिळाले नाही पण विराटची कामगिरी चांगली
आरसीबी संघाला यावेळीही जेतेपद पटकावता आले नसले तरी कोहलीने शानदार कामगिरी केली. या मोसमात कोहलीने 2 शतके ठोकली आणि एकूण 639 धावा केल्या. कोहलीने 53.25 च्या सरासरीने 639 धावा केल्या ज्यात 2 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाजही ठरला आहे. कोहलीने आता आयपीएलमध्ये एकूण 7 शतके ठोकली आहेत.
सलग 2 सामन्यात शतक ठोकणारा कोहली तिसरा फलंदाज
याशिवाय कोहली आयपीएलमध्ये सलग 2 सामन्यात शतक ठोकणारा तिसरा फलंदाज बनला आहे. कोहलीने या मोसमात ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते पाहता चाहत्यांना 2016 चा आयपीएल हंगाम आठवला. त्या आयपीएल हंगामात कोहलीने 4 शतके ठोकली होती आणि एकूण 973 धावा केल्या होत्या.
आयपीलएल संदर्भातील अन्य बातमी वाचा
RCB Vs GT सामन्याचे मोमेंट्स:अनुष्काचा विराटला फ्लाइंग किस, गिलने षटकार मारून संपवला सामना; राशिदच्या फिरकीने मॅक्सवेल बाद
गुजरात टायटन्सने रविवारी रात्री इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे आरसीबीला प्लेऑफसाठी पात्रता मिळवता आली नाही. या सामन्यात शुभमन गिलने षटकार ठोकत गुजरातला विजय मिळवून दिला. विराट कोहलीचे शतक पूर्ण केल्यानंतर पत्नी अनुष्का शर्माने स्टँडवरून फ्लाइंग किस दिला आणि ग्लेन मॅक्सवेल रशीद खानच्या फिरकीसमोर हतबल झाला. सामन्याचे असे क्षण आणि त्यांचा इम्पॅक्ट - या बातमीत जाणून घ्या...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.