आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Khelo India Youth Tournament | Maharashtra Kho Kho Team In The Semi finals For The Fourth Time In A Row

खेलो इंडिया युवा स्पर्धा:महाराष्ट्र खो-खो संघ सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीमध्ये

इंदूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय खेळाडू दीपाली राठोडने सर्वोत्तम आक्रमक खेळी करत महाराष्ट्र महिला संघाला पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या उपांत्य फेरी गाठून दिली. नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. महाराष्ट्र संघाने ७ गुणांनी पश्चिम बंगालवर मात केली. महाराष्ट्र संघाचा उपांत्य सामना दिल्लीविरुद्ध रंगणार आहे. तसेच महिला गटाच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक संघ समोरासमोर असतील. महिला गटात नाशिकची निशा वैजल, कोल्हापूरची श्रेया पाटील, उस्मानाबादची अश्विनी शिंदे यांनी सर्वोत्कृष्ट केळी करत महाराष्ट्र संघाला पहिल्याच डावात १० गुणांची आघाडी मिळवून दिली होती. दुसरीकडे, बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचा सलग दुसरा पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्राचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तामिळनाडूने महाराष्ट्राला ९५-६२ ने हरवले. महाराष्ट्राकडून मुस्कान सिंग व भूमिका सर्जेने उत्कृष्ट खेळ केला.

बॉक्सिंगमध्ये देविकाचे पदक निश्चित बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राच्या देविका घोरपडेने उपांत्य फेरीत स्थान मिळवत पदक निश्चित केले आहे. ५२ किलोत देविकाने हरियाणाच्या अंजलीकुमारीचा सहज पराभव केला. ७५ किलोत अभिषेक जांगिडने अरुणाचल प्रदेशच्या रिंचन देपकाचा ५-० असा धुव्वा उडवला. ७१ किलोत महाराष्ट्राच्या कुणाल घोरपडेला आसामच्या हेमंत छेत्रीकडून पुढे चाल मिळाली.‌ ५४ किलो गटात नीरज राजभरचे आव्हान संपुष्टात आले.

बातम्या आणखी आहेत...