आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखो-खो हा खेळ ३२ देशात सुरू झाला आहे. त्यामुळेच या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी आंतरराष्ट्रीय खो खो संघटना स्थापन करण्यात आली असून त्याचे कार्यालय इंग्लंडमध्ये तर उपकार्यालय दिल्लीमध्ये आहे. भविष्यात एशियन आणि जागतिक खो खो स्पर्धा आयोजनाचा फेडरेशनचा मानस आहे, असे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस एम.एस. त्यागी यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
खो खो हा भारतीय खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी फेडरेशन प्रयत्नशील असल्याचे सांगून ते म्हणाले, "सर्व राज्यांना आम्ही मॅट देत आहोत. जे राज्य मागणी करतील त्यांना प्रथम उपलब्ध करून देण्यात येईल. राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंच्या निवास व भोजन व्यवस्थेचा दर्जाही सुधारण्यात आला आहे. 2018 पासून राष्ट्रीय स्पर्धेतील अव्वल चार संघास तीन, दोन, एक आणि एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात सुरुवात झाली आहे. तसेच सर्वोत्कृष्ट अष्टपैलू, आक्रमक आणि संक्षकास प्रत्येकी 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येत आहे." असेही त्यांनी सांगितले.
फेब्रुवारी 2022 मध्ये खो खो लीग
आयपीएलच्या धर्तीवर भारतात फेब्रुवारी २०२२ मध्ये खो खो लीग घेण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकत्ता, बंगळूर आणि भुवनेश्वरमध्ये ही लीग घेण्याचे नियोजन आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये वरिष्ठ गटाची राष्ट्रीय स्पर्धा मेरठ अथवा बंगळूरु मध्ये घेण्यात येईल.
खेळाडूंचे तंत्रशुद्ध शिबिर
फेडरेशनने खेळाडूंच्या विकासासाठी भारतातील 120 पुरुष व 60 महिला खेळाडूंचे तंत्रशुद्ध शिबिर घेतले होते. त्यातील खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, याचा अहवाल त्यांना व राज्य संघटनेस पाठविला आहे. तसेच पंच व प्रशिक्षकांचे 15 दिवसांचे शिबिर घेण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.