आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Kieron Pollard Six Sixes | WestIndies Vs Sri Lanka T20; Akila Dhananjay Hat Trick And Kieron Pollard Hit 6 Sixes In An Over

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलार्डने केली युवराजची बरोबरी:श्रीलंकेविरोधात वेस्टइंडिजचा कर्णधार कीरोन पोलार्डने एका ओव्हरमध्ये मारले 6 षटकार

जमैकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामन्यात विंडीजने श्रीलंकेवर विजय मिळवला

भारतीय ऑलराउंडर युवराज सिंगने 14 वर्षांपूर्वी एक मोठा रेकॉर्ड केला होता. युवीने 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये 6 षटकार लगावले होते. मागील 14 वर्षांपासून हा रेकॉर्ड युवीच्या नावे होता. पण, आता वेस्टइंडीजचा कर्णधार कीरोन पोलार्डने युवीच्या या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

वेस्टइंडिज आणि श्रीलंकेदरमम्यान गुरुवारी झालेल्या टी-20 सामन्यात वेस्टइंडिजचा कर्णधार कीरोन पोलार्डने अकीला धनंजयच्या ओव्हरमध्ये 6 षटकार मारुन युवीच्या रेकॉर्डची बरोबरी केली. हा सामना वेस्टइंडिजने 4 विकेटने जिंकला. युवराजशिवाय साउथ आफ्रिकेच्या हर्शल गिब्सनेही 2007 वन-डे वर्ल्ड कपमध्ये नीदरलंडविरोधात एका ओव्हरमध्ये सहा षटकार लगावले आहेत

सामन्यात नेमके काय झाले ?

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 131 रन काढले. प्रत्युत्तरात वेस्टइंडीजने 13.1 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 134 रन काढल्या. सामन्यात श्रीलंकेचा ऑफ स्पिनर अकीला धनंजयने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेऊन विंडीज टीमला अडचणीत टाकले होते. पण, अकीलाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये विंडीजचा कर्णधार कीरोन पोलार्डने सलग 6 षटकार मारुन सामना आपल्या बाजूने वळवला.

बातम्या आणखी आहेत...