आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • King Nadal's Defeat On Clay Court; A Big Blow To The Preparations For The French Open

फ्रेंच ओपन:किंग नदालचा क्ले कोर्टवर पराभव; फ्रेंच ओपनच्या तयारीला बसला मोठा धक्का

ख्रिस्तोफर क्लेरिरोम8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्ले कोर्टवरील किंग राफेल नदालला शुक्रवारी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचा क्ले कोर्टवर सुरू असलेल्या इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला. डेनिस शापाेवालाेवने पुरुष एकेरीच्या सामन्यामध्ये नदालविरुद्ध सनसनाटी विजयाची नोंद केली. त्याने १-६, ७-५, ६-२ ने रोमहर्षक विजयाची नोंद केली. याच सुमार खेळीमुळे नदालच्या आगामी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तयारीला धक्का बसला आहे. पुढच्या आठवड्यात सत्रातील या तिसऱ्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला पॅरिसमध्ये सुरुवात होणार आहे.

१३ वा मानांकित शापाेवालाेव हा आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळी केली. त्यामुळे नदालला आपल्या आवडत्या क्ले कोर्टवर समाधानकारक खेळी करता आली नाही. त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. स्पेनचा राफेल नदाल पुढच्या महिन्यात ३ जून रोजी ३६ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. त्याने टेनिस करिअरमध्ये विक्रमी १४ ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत.

बातम्या आणखी आहेत...