आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Kings XI Punjab Vs Royal Challengers Bangalore IPL 2020 Match 31st Live Cricket Score And Latest Updates

KXIP vs RCB LIVE:किंग्स XI पंजाबचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 8 गडी राखून दणदणीत विजय, पंजाबचा कर्णधार राहुल आणि क्रिस गेलचे शानदार अर्धशतक

शारजाह2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 31व सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि किंग्स इलेवन पंजाब (KXIP) दरम्यान शारजाहमध्ये झाला. या सामन्यात पंजबाने आठ गडी राखुन बंगळुरूवर दणदणीत विजय मिळवला. बंगळुरूने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत पंजाबला 172 धावांचे लक्ष्य दिले होते. हा या सीजनचा शारजाजमधील सर्वात लहान स्कोअर आहे. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

गेलने सीजनच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक केले

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबची शानदार सुरुवात झाली. कर्णधार लोकेश राहुलने 61, क्रिस गेलने 53 आणि मयंक अग्रवालने 45 धावा केल्या. गेलचा सीजनचा हा पहिला सामना होता आणि गेलने पहिल्याच सामन्यात अर्धशतक केले. मयंकची एकमात्र विकेट चहलने घेतली. त्यानंतर गेल रन आउट झाला.

विराट कोहलीचा आरसीबीसाठी हा 200वा मॅच आहे. कोहलीने आयपीएलमध्ये 185 आणि चॅम्पियंस लीगमध्ये 15 टी-20 खेळले आहेत. या सामन्यात कोहलीने 39 बॉलवर 48 रन केले.

शमीने एका ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या

कोहलीशिवाय शिवम दुबेने 23 आणि एरॉन फिंचने 20 रन काढले. पंजाबच्या मोहम्मद शमी आणि मुरुगन अश्विनने 2-2 विकेट घेतल्या. मोहम्मद शमीने एका ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या. शमीने डिविलियर्स (2) ला दीपक हूडा आणि कोहलीला लोकेश राहुलकडे कॅच आउट केले.

एरॉन फिंच 20 रन काढून अश्विनच्या बॉलवर बोल्ड झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल 18 रनांवर आउट झाला.अर्शदीप सिंहने पडिक्कलला निकोलस पूरनकडे कॅच आउठ केले. कोहलीचा हा आरसीबीसाठी 200वा सामना आहे.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने संघात कोणतेच बदल केले नाही. तर, पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने टीममध्ये तीन बदल केले आहेत. मनदीप सिंग, प्रभसिमरन सिंग आणि मुजीब उर रहमानला बाहेर केले आहे. त्याजागी क्रिस गेल, मुरुगन अश्विन आणि दीपक हूडाला संधी दिली आहे. क्रिस गेलचा या सीजनमधला हा पहिला सामना आहे.

दोन्ही संघ

पंजाब: क्रिस गेल, लोकेश राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, ग्लेन मैक्सवेल, दीपक हूडा, क्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, रवि बिश्नोई आणि अर्शदीप सिंह.

बंगळुरू: देवदत्त पडिक्कल, एरॉन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स (विकेटकीपर), क्रिस मॉरिस, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, इसुरु उडाना, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज.

बातम्या आणखी आहेत...