आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Kings XI Punjab Vs Sunrisers Hyderabad Match 43rd Live Cricket Latest Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KXIP vs SRH:पंजाबचा हैदराबादवर 12 धावांनी विजय; सलग चार सामने जिंकून पंजाब स्पर्धेत कायम

दुबईत6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 43वा सामना किंग्स इलेवन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाददरम्यान दुबईत झाला. पंजाबने हैदराबादला 127 रनाचे टार्गेट दिले होते. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 119 धावांवर ऑल आउट झाला. स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

हैदराबादकडून ओपनर डेविड वॉर्नर (35) आणि जॉनी बेयरस्टो (19) ने चांगली सुरुवात केली. याशिवाय टीमने 7 ते 9 ओव्हरदरम्यान 11 रन देऊन तीन विकेट गमवल्या. मनीष पांडे आणि विजय शंकरने चौथ्या विकेटसाठी 33 रनांची पार्टनरशिप केली. यत मनीषने 29 बॉलवर 15 आणि विजयने 27 बॉलवर 26 रन केले.

पंजाबने 7 विकेट गमावून 126 रन केले. सलामीवीर लोकेश राहुल आणि मनदीप सिंगने चांगली सुरुवात केली, पण चांगल्या स्कोअरपर्यंत संघ जाऊ शकला नाही. हैदराबादच्या संदीप शर्मा, राशिद खान आणि जेसन होल्डरने पंजबाच्या प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पंजाबसाठी निकोलस पूरनने नाबाद 32, राहुलने 27, क्रिस गेलने 20, मनदीपने 17 रन केले.

हैदराबादमध्ये एक बदल करण्यात आला आहे. शाहबाज नदीमच्या जागी खलील अहमदला संधी देण्यात आली आहे. तर, पंजाबच्या प्लेइंग इलेवनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. मयंक अग्रवाल आणि जिमी नीशमच्या जागी मनदीप सिंग आणि क्रिस जॉर्डनचे पुनरागमन झाले आहे. दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक आहे.

दोन्ही संघ

पंजाब: लोकेश राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मैक्सवेल, मनदीप सिंह, दीपक हूडा, मुरुगन अश्विन, क्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई आणि मोहम्मद शमी.

हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, विजय शंकर, प्रियम गर्ग, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, खलील अहमद, संदीप शर्मा आणि टी नटराजन.

बातम्या आणखी आहेत...