आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Kiran Of Selapur Gets A Chance To Debut In T20, Smriti Is Selected As Vice captain

इंग्लंड दाैरा:साेलापूरच्या किरणला टी-20 मध्ये पदार्पणाची संधी, स्मृतीची उपकर्णधारपदी निवड

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिला क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात इंग्लंड दाैरा करणार आहे. या दाैऱ्यावर भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात वनडे, टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. भारतीय महिला संघाची या प्रत्येकी तीन वनडे व टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी शुक्रवारी घाेषणा करण्यात आली. हरमनप्रीत काैरच्या नेतृत्वाखाली महिला संघ हा दाैरा करणार आहे.

यादरम्यान महाराष्ट्राच्या स्मृतीकडे दाेन्ही संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा साेपवण्यात आली. तसेच साेलापूरची गाेलंदाज किरण नवगिरेला आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. येत्या १० सप्टेंबरपासून या दाेन्ही संघातील टी-२० मालिकेला सुरुवात हाेईल. हे ३ सामने १०, १३ व १५ सप्टेंबरदरम्यान हाेतील. त्यानंतर लगेच १८ सप्टेंबरपासून वनडे मालिका रंगणार आहे. याचे ३ सामने १८, २१ व २४ सप्टेंबरदरम्यान आयाेजित करण्यात आले. वनडे संघात झुलन गाेस्वामीचे पुनरागमन झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...