आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किवी-लंकेची ऐतिहासिक 2500 वी कसोटी लढत:पहिल्या दिवशी यजमानांच्या 2 बाद 155 धावा

वेलिंग्टन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना शुक्रवारपासून वेलिंग्टन येथे सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान न्यूझीलंडने पहिल्या डावात २ बाद १५५ धावा केल्या होत्या. सलामीवीर डेव्हन कॉन्वेने (७८) अर्धशतक ठोकले. नाणेफेक जिंकून गोलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेकडून रजिथा आणि सिल्वाने १-१ बळी घेतला. पाऊस व खराब प्रकाशामुळे दिवसभरात केवळ ४८ षटकांचा खेळ झाला. न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यातील हा सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील २५०० वा सामना आहे. १८७७ साली सुरू झालेल्या या कसोटीला १५ मार्च रोजी १४६ वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील सामन्यापासून आतापर्यंत १२ देशांचे ३,१२१ खेळाडू कसोटी खेळले.

हे खेळाडू बनले दिग्गज {सर्वाधिक धावा सचिन तेंडुुलकर (15,921 धावा) {सर्वाधिक बळी मुथैया मुरलीधरन (800 बळी) {सर्वाधिक नेतृत्व केले ग्रीम स्मिथ (109 लढत)

आकड्यात १४६ वर्षांतील कसोटी (२४९९ कसोटीपर्यंत) {सामने 2499 {धावा 24,73,523 {चेंडू 51,39,301 {बळी 77,314 {शतके 4,390 {अर्धशतके 10,701 {झेल 45,578 {स्टंपिंग्ज 1,532 {5-बळी 3,184 {अतिरिक्त 1,39,061 {निकाल 1,711 (68.5%)

बातम्या आणखी आहेत...