आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • KKR VS SRH Head To Head Record IPL Dream Playing 11 And Match Preview | Kolkata Knight Riders Vs Sunrisers Hyderabad IPL Today Latest News And Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KKR vs SRH:कोलकाताला नाइट रायडर्सचा 7 गडी राखून हैदराबादवर विजय; शुभमन गिलच्या 62 चेंडूत नाबाद 70 धावा

अबु धाबी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सीजनच्या ओपनिंग मॅचमध्ये कोलकाताला मुंबई आणि हैदराबादला बंगळउरूने मात दिली आहे

आयपीएलच्या 13 व्या सीजनचा आठवा सामना आज कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि सनराइजर्स हैदराबाद (एसआरएच)मध्ये आज अबु धाबीमध्ये झाला. हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्मय घेतला होता. हैदराबादने कोलकाताला या सीजनमधील सर्वात लहान 143 रनांचे टार्गेट दिले आहे. कोलकाताने हे टार्गेट 12 चेंडू आणि 7 गडी राखत पूर्ण केले. कोलकाताने सीजनमधला पहिला विजय मिळवला. शुभमन गिल सामन्याचा हिरो ठरला. त्याने 62 बॉलमध्ये नाबाद 70 धावा केल्या. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा दोन्ही संघ यूएईत समोरासमोर आले होते. या सीजनच्या सलामीच्या सामन्यात हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून तर, केकेआरला मुंबईकडून मात मिळाली.

दोन्ही संघ

कोलकाता: सुनील नरेन, शुभमन गिल, दिनेश कार्तिक (कर्णधार विकेटकीपर), नीतीश राणा, इयोन मोर्गन, आंद्रे रसेल, पैट कमिंस, वरुण चक्रतर्वी, कुलदीप यादव, शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी.

हैदराबाद: जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), डेविड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, प्रियम गर्ग, मोहम्मद नबी, ऋद्धिमान साहा, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि टी नटराजन.

दोन्ही संघातील महाग खेळाडू

हैदराबादमध्ये सर्वात महाग डेविड वॉर्नर आहे. वॉर्नरला फ्रेंचायझीने एका सीजनसाठी 12.50 कोटी रुपये मोजले आहेत. यानंतर मनीष पांडे (11 कोटी) तर, कोलकातामध्ये सर्वात महाग पॅट कमिंस आहे. त्याला फ्रेंचायझीने 15.50 कोटी रुपयात खरेदी केले आहे. यानंतर सुनील नरेन (12.50 कोटी) मिळाले आहेत.

केकेआरसाठी कार्तिक, रसेल आणि नरेन की-प्लेयर्स

कोलकाताला ऑफ स्पिनर आणि ओपनर फलंदाज सुनील नरेनसोबतच आंद्रे रसेलकडून मोठी आशा आहे. 2019 सीजनमध्ये रसेलने आक्रामक फलंदाजी करत 52 षटकार मारले होते. आयपीएलमध्ये रसेलचा सर्वात जास्त 186.41 स्ट्राइक रेट आहे.

वॉर्नर आणि विलियम्सन हैदराबादचे मजबूत फलंदाज

हैदराबादकडे वॉर्नरसोबतच अलावा जॉनी बेयरस्टो, प्रियम गर्ग आणि मनीष पांडेसारखे धुरंधर फलंदाज आहेत. तर, बॉलिंगमध्ये भुवनेश्वर कुमार, राशिद खान आणि खलील अहमद आहेत.

बातम्या आणखी आहेत...