आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा विश्‍वचषक:आजपासून बाद फेरीचे सामने; हाॅलंडसमाेर अमेरिकेचे आव्हान

दाेहा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता विश्वचषकाच्या बाद फेरीला शनिवारपासून सुरुवात हाेत आहे. यादरम्यान पहिल्याच दिवशी हाॅलंड आणि अमेरिका संघांत उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार आहे. या सामन्यादरम्यान हाॅलंड टीमला विजयाचे दावेदार मानले जात आहे. टीमची आतापर्यंतची कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे. त्यामुळे हा डच संघ कागदावर बलाढ्य मानला जात आहे. मात्र, यंदाच्या विश्वचषकात अमेरिका टीमची कामगिरी काैतुकास्पद ठरली आहे. सध्या अमेरिका संघ जायबंदी खेळाडूंमुळेच काहीशी अडचणीत सापडली आहे. टीमचा फाॅरवर्ड पुलिसिक आणि जाेश सर्जंट सध्या जायबंदी आहेत. या दाेघांचा बाद फेरीतील सामन्यात सहभाग असेल, असा दावा प्रशिक्षक ग्रेग यांनी केला आहे. अमेरिका संघाची गटातील कामगिरी उल्लेखनीय ठरली.

कोच कोच {हाॅलंड संघाचे प्रशिक्षक लुई वॅन यांनी विजयासाठी खास डावपेच आखले आहेत. {अमेरिका संघाचे प्रशिक्षक ग्रेग बेरहल्टरने सर्वाेत्तम खेळीचा सल्ला दिला आहे. यासाठी टीमने कसून सराव केला.

आॅस्ट्रेलिया-अर्जेंटिना आज उपउपांत्यपूर्व फेरीत झुंजणार आॅस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना संघामध्ये रविवारी मध्यरात्री १२.३० वाजेदरम्यान प्री-क्वार्टर फायनल हाेणार आहे. अर्जेंटिना संघाला या सामन्यात विजयाचा दावेदार मानले जाते. टीमने आतापर्यंत ७ पैकी पाच सामन्यांत आॅस्ट्रेलियावर मात केली. फिफा विश्वचषकात या दाेन्ही संघांत दाेन सामने झाले. यात अर्जेंटिना संघाने एक विजय मिळवला. तसेच एक सामना बराेबरीत राहिला हाेता. आता या सामन्यात मेसीच्या खेळीवर सर्वाचे लक्ष लागले आहे.

प्लेअर्स टू वॉच { अमेरिका संघाच्या विजयाची मदार फाॅरवर्ड क्रिश्चियन पुलिसिकवर असेल. ताे मैदानावर वेगवान खेळी करताे. त्यामुळे संघाला विजयासाठी माेठा फायदा हाेणार आहे.

{ हाॅलंड संघाकडून फाॅरवर्ड काेडी सध्या फाॅर्मात आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांत टीमकडून पहिल्या गाेलची नाेंद केली. त्याच्या नावे तीन गाेल आहेत.

बातम्या आणखी आहेत...