आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Kolhapur Sport News | Volleyball Coaches In The State, Immersed In The Training Of Sports Teacher Coaches

कोल्हापूर:राज्यातील व्हॉलीबॉल प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणात तल्लीन; देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या कामगिरीच्या उद्देशाने प्रशिक्षण

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय वरिष्ठ व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक पी. सी. पांडियन (तामिळनाडू) आणि डॉ. एम. एच. कुमारा (कर्नाटक) यांनी 'व्हॉलीबॉल प्रशिक्षण पद्धती' यावर मार्गदर्शन केले. - Divya Marathi
भारतीय वरिष्ठ व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक पी. सी. पांडियन (तामिळनाडू) आणि डॉ. एम. एच. कुमारा (कर्नाटक) यांनी 'व्हॉलीबॉल प्रशिक्षण पद्धती' यावर मार्गदर्शन केले.

व्हॉलीबॉल खेळाडू घडविण्यासाठी आवश्यक नाविन्यपूर्ण तंत्र, कौशल्ये, व्यायाम प्रकार आत्मसात करताना राज्यातील प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणात तल्लीन झाल्याचे चित्र आज बाचणी (ता. कागल) येथे दिसून आले.

व्हॉलीबॉल डेव्हलपमेंट फाऊंडेशन ऑफ इंडियाने (व्हीडीएफआय) आयोजित केलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाचा आज शनिवारी दुसरा दिवस होता. भारतीय वरिष्ठ व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक पी. सी. पांडियन (तामिळनाडू) आणि डॉ. एम. एच. कुमारा (कर्नाटक) हे 'व्हॉलीबॉल प्रशिक्षण पद्धती' यावर मार्गदर्शन करीत आहेत. व्याख्यान, सादरीकरण, प्रात्यक्षिक, संवाद, प्रत्यक्ष सहभाग आदी माध्यमांतून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

राज्यात उत्तम व्हॉलीबॉल खेळाडू तयार व्हावेत आणि त्यांनी देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करावी, या उद्देशाने माजी खेळाडूंनी 'व्हीडीएफआय'च्या माध्यमातून चळवळ सुरू केली आहे. त्याची सुरुवात प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणापासून झाली आहे. या शिबिरामध्ये राज्यातील चार 'एमआयएस' प्रशिक्षकांसह सुमारे ८० प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक सहभागी झाले आहेत.

या शिबिराचे औपचारिक उदघाटन सांगलीतील ज्येष्ठ व्हॉलीबॉल प्रशिक्षक एम. टी. देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. यावेळी बाचणीचे माजी सरपंच निवास पाटील, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक अजित पाटील, माजी राष्ट्रीय खेळाडू मिलींद गोरटे, दीपक बागल, राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. डॉ. स्वप्नील पाटील, राजेश काटकर, किरण देशमुख, प्रशांत कांबळे, संतोष चिमण्णा आदी उपस्थित होते.

अशा पद्धतीची प्रशिक्षण शिबिरे भविष्यात राज्यभरात आयोजित केली जाणार आहेत. या बरोबर खेळाडूंसाठी व्हॉलीबॉलशी संबंधित विविध कौशल्य शिबिरे, त्यांच्या आहारासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, विविध गटातील स्पर्धांचे आयोजन आदी विविध पातळ्यांवर 'व्हीडीएफआय' नियोजनबद्ध काम करणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

समविचारी साथीदारांना सोबत घेऊन जात-पात, धर्म, राजकारण विरहीत वातावरणात व्हॉलीबॉलची पुढची पिढी घडविण्याचा माजी खेळाडूंचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, अशा शब्दात श्री. देसाई यांनी संयोजकांचे कौतुक केले.

शिबिराचा समारोप उद्या रविवारी माजी राष्ट्रीय खेळाडू तथा प्राप्तिकर आयुक्त विपुल वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...