आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Kolkata Knight Riders Vs Kings XI Punjab Match 46th Live Cricket Latest Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KKR vs KXIP:पंजाबचा कोलकातावर दणदणीत विजय; सलग 5वा सामना जिंकून टॉप-4 मध्ये पोहचली किंग्स इलेवन; क्रीस गेलचे शानदार अर्धशतक

शारजाह6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 46वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि किंग्स इलेवन पंजाब (KXIP) दरम्यान शारजाहमध्ये झाला. सामन्यात पंजाबकडून कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चा 8 गडी राखून पराभव करण्यात आला. या सलग 5 व्या विजयासह पंजाब टॉप फोरमध्ये पोहचील असून प्ले ऑफचा मार्ग मोकळा झाला आहे. कोलकाताने पंजाबला 150 धावांचे लक्ष्य दिले होते. शारजाहमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाताने पंजाबला 150 रनांचे टारगेट दिले होते. पंजाबने 18.5 ओवरमध्ये 2 विकेट गमावून 150 रन केले. या सामन्यात क्रिस गेलने IPL मधले 30वे आणि मनदीप सिंगने 6वे अर्धशतक लगावले. गेल 29 बॉलवर 51 रन काढून आउट झाला. तर, मनदीप 56 बॉलवर 66 रनावर माघारी परतला. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

2 ओव्हरमध्ये 3 विकेट गेल्या

कोलकाताची सुरुवात खराब होती. मागच्या सामन्यात चांगली कामगिरी करणारा नीतीश राणा झिरोवर आउट झाला. ग्लेन मॅक्सवेलने राणाला आउट केले. पुढील ओव्हरमध्ये राहुल त्रिपाठी (7) आणि दिनेश कार्तिक (0) ला शमीने आउट केले.

मॉर्गन-गिलची 81 धावांची भागीदारी

तीन विकेट पडल्यानंतर शुभमन गिलने कर्णधार इयोन मॉर्गनसोबत एक बाजू सांभाळली. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 81 रनांची पार्टनरशिप झाली. यानंतर मॉर्गनला विश्नोईने आउट केले.

दोन्ही संघात कोणतेच बदल नाही

पंजाबचा ओपनर मयंक अग्रवाल आणि कोलकाताचा ऑलराउंडर आंद्रे रसेल पूर्णपणे फिट नाहीत. त्यामुळे दोन्ही संघांनी आपल्या मागच्या प्लेइंग इलेवनमध्ये कोणतेच बदल केले नाहीत.

दोन्ही संघातील परदेशी खेळाडू

पंजाबमध्ये क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल आणि क्रिस जॉर्डन परदेशी खेळाडू आहेत. तर, कोलकातामध्ये कर्णधार इयोन मॉर्गन, सुनील नरेन, पॅट कमिंस आणि लोकी फर्ग्यूसन आहेत.

दोन्ही संघ

पंजाब: लोकेश राहुल (कर्णधार, विकेटकीपर), मनदीप सिंह, क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मैक्सवेल, दीपक हूडा, क्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह.

कोलकाता: शुभमन गिल, नीतीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), इयोन मॉर्गन (कर्णधार), सुनील नरेन, पैट कमिंस, लोकी फर्ग्यूसन, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती.

बातम्या आणखी आहेत...