आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Kolkata Knight Riders Vs Royal Challengers Bangalore Match 39th Live Cricket Latest Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RCB vs KKR:बंगळुरुकडून कोलकाताचा 8 गडी राखून पराभव; 7व्या विजयासह आरसीबीची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप

अबु धाबीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 39वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) दरम्यान अबु धाबीमध्ये होत आहे. कोलकाताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि बंगळुरुला या सीजनमधील सर्वात कमी 85 धावांचे लक्ष्य दिले. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीने 13.3 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 85 रन पूर्ण केले.​​​​​​​स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

आरसीबीकडून देवदत्त पडिक्कलने 25, एरॉन फिंचने 16, गुरकीरत सिंगने 21 आणि विराट कोहलीने 18 रन केले. केकेआरकडून लोकी फर्ग्यूसनने एक विकेट घेतली. फिंचला फर्ग्यूसनने विकेटकीपर दिनेश कार्तिककडून कॅच आउट केले, तर पडिक्कलला पॅट कमिंसने रनआउट केले.

कोलकाताचे 5 फलंदाज 10 धावाही करू शकले नाही. कर्णधार इयोन मॉर्गनने सर्वाधिक 30 रन केले. आरसीबीसाठी मोहम्मद सिराजने 3 आणि युजवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतल्या.

केकेआरने 14 रनांवर 4 विकेट गमवल्या

कोलकाताची खूप खराब सुरुवात झाली. 14 रनांवर 4 विकेट गेल्या. शुभमन गिल (1), राहुल त्रिपाठी (1), नीतीश राणा (0) आणि टॉम बेंटन (10) स्वस्तात आउट झाले. मोहम्मद सिराजने दुसऱ्या ओव्हरमध्ये सलग दोन बॉलवर दोन विकेट घेतल्या.

चहलने दिनेश कार्तिक (4) ला एलबीडब्ल्यू आणि पॅट कमिंस (4) ला देवदत्त पडिक्कलकडे कॅच आउट केले. ओपनर शुभमन गिल 6 बॉलवर 1 रन काढून नवदीप सैनीच्या बॉलवर आउट झाला.

मोहम्मद सिराजने दुसऱ्या ओव्हरमध्ये सलग दोन बॉलवर दोन विकेट घेतल्या. यात राहुल त्रिपाठी (1) आणि नीतीश राणा शून्य रनावर आउट झाला.

दोन्ही संघ

कोलकाता: शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नीतीश राणा, इयोन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), टॉम बेंटन, पैट कमिंस, कुलदीप यादव, लोकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती.

बंगळुरू: देवदत्त पडिक्कल, एरॉन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स (विकेटकीपर), गुरकीरत सिंह मान, वाशिंगटन सुंदर, क्रिस मॉरिस, मोहम्मद सिराज, इसुरु उडाना, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल.