आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Komal Of Pandharpur Wins Gold In The Steeplechase Race And Qualifies For The Asian Championships Marathi News

राष्ट्रीय फेडरेशन कप मैदानी स्‍पर्धा:पंढरपूरच्या कोमलला स्टिपलचेस शर्यतीत सुवर्ण, आशियाई स्पर्धेसाठीही पात्र

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालिकत (केरळ) येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या २५ व्या राष्ट्रीय फेडरेशन कप मैदानी स्पर्धेत महिला गटात पंढरपूरच्या कोमल चंद्रकांत जगदाळे हिने सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे ती आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. कालिकत विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सोमवारी तिने तीन हजार मीटर स्टिपलचेस शर्यत ९ मिनिटे ४७.८६ सेकंदात पूर्ण केली. उत्तर प्रदेशच्या रिचा भादुरियाने (१०.१४.५३ मिनिटे) रौप्य आणि तेलंगणाच्या जी. माहेश्वरीने (१०.४७.३० मिनिटे) ब्राँझ मिळवले.

भुवनेश्वर येथे २४ फेब्रुवारीला झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत कोमलने हीच शर्यत १० मिनिटे ००.२३ सेकंदात पूर्ण करीत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळविले होते. तिने या स्पर्धेत आपली कामगिरी सुधारली आहे. परंतु कोमलला महाराष्ट्राच्याच ललिता बाबर (९.१९.७६ मिनिटे) हिचे रेकॉर्ड मोडण्यासाठी २८ सेकंदाने आपली कामगिरी सुधारायची आहे.

बातम्या आणखी आहेत...