आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Kripashankar Bishnai's Secret Lots Of Wrongdoing In Wrestling, Complaints Ignored: Coach

कृपाशंकर बिश्नाेई यांचा गाैप्यस्फाेट:कुस्तीत भरपूर चुकीच्या गाेष्टी,  तक्रारीकडे दुर्लक्ष : प्रशिक्षक

मनीष पांडे /सुमय कर | रायपुर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुस्तीमध्ये अनेक चुकीच्या गाेष्टी घडत हाेत्या. त्याचा अनेक युवांना माेठा जाच सहन करावा लागला. याशिवाय त्यांच्या गुणवत्तेला डावलण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याचा माेठा फटका त्या युवांना बसला. हा चुकीचा प्रकार मला त्यावेळी पहावला जात नव्हता. म्हणून मी धाडस करून याची तक्रारही केली हाेती. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशा शब्दात अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीचे प्रशिक्षक कृपाशंकर बिश्नाेई यांनी गाैप्यस्फाेट केला. यादरम्यान त्यांनी कुस्ती महासंघाच्या कामकाज पद्धतीवर प्रचंड राेष व्यक्त केला.

‘मी १७ डिसेंबर २०२२ मध्ये भारतीय कुस्ती महासंघाकडे मेलवरून तक्रार केली हाेती. महासंघाने २२ नवख्या प्रशिक्षकांची भरती केली हाेती. त्यांना काेणत्याही प्रकारचे तंत्रशुद्ध प्रशिक्षणही देता येत नव्हते,अशी तक्रारही केली. मात्र, त्यानंतर थेट माझ्यावरच कारवाई करण्यात आली. मला पदावरून काढले गेले.

बातम्या आणखी आहेत...