आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:हार्दिक आणि कृणाल पांड्याला पितृशोक, हिमांशु पांड्या यांचे हार्ट अटॅकमुळे निधन

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्या यांने वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताचे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. आज शनिवारी हिमांशु पांड्या यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले. हार्दिक आणि कृणाल यांना क्रिकेटपटू घडवण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा होता. पण आज अचानक हिमांशु यांना हार्ट अॅटॅक आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्या यांने वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. यंदाच्या सत्रात तीन सामन्यात क्रृणालने बडोद्याच्या संघाचे नेतृत्व केले.

बडोद्याच्या क्रिकेट संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर हटंगडी यांनी सांगितले की, 'पंड्या यांच्या कुटुंबियांसाठी ही सर्वात वाईट बातमी आहे. कृणाल पंड्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तो संघाला सोडून घरी पोहोचला आहे. त्यांच्या दुखा:त आम्ही सर्व सहभागी आहोत.

बातम्या आणखी आहेत...