आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • KXIP VS RCB IPL Match Today | Kings XI Punjab And Royal Challengers Bangalore IPL Latest News And Dream 11 Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KXIP vs RCB:पंजाबची बंगळुरूवर मात; लाेकेशकडून वेगवान धावांचा सचिनचा विक्रम ब्रेक

दुबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरसीबी 3 वेळा (2009, 2011, 2016) फायनलमध्यो पोहचली, प्रत्येक वेळेस पराभव
  • पंजाब एकदा (2014) फायनलमध्ये पोहचली, कोलकाताकडून पंबाजचा पराभव

गत सामन्यातील पराभवातून सावरलेला किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आता १३ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये विजयी ट्रॅकवर परतला आहे. सामनावीर लाेकेश राहुलच्या (१३२) नाबाद झंझावाती शतकापाठाेपाठ रवी बिश्नाेई (३/३२) आणि एम. अश्विनच्या (३/२१) भेदक गाेलंदाजीच्या बळावर पंजाब संघाने गुरुवारी लीगमधील दुसऱ्या सामन्यात विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत केले. पंजाबच्या संघाने १७ षटकांत ९७ धावांनी विजयश्री खेचून आणली. पंजाबने काेहलीच्या बंगळुरू टीमच्या दुसरा सामना जिंकण्याच्या माेहिमेला ब्रेक लावला.

बंगळुरूचा लीगमधील हा पहिला पराभव ठरला. लाेकेश राहुलने आयपीएलमधील वेगवान धावात सचिनच्या (६३ डाव) विक्रमाला मागे टाकले. त्याने ६० डावांत २ हजार धावा पूर्ण केल्या. प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ३ गड्यांच्या माेबदल्यात बंगळुरूच्या टीमसमाेर विजयासाठी २०७ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात रवी बिश्नाेई व अश्विनच्या भेदक माऱ्याने कंबरडे माेडलेल्या बंगळुरू संघाने अवघ्या १०९ धावांवर गाशा गुंडाळला. टीमकडून युवा फलंदाज वाॅशिंग्टन संुदरने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. इतर फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार विराट काेहली १ धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.

रवी, अश्विनने बंगळुरूला राेखले : खडतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बंगळुरू संघाची न सुरुवात िराशाजनक झाली. रवी आणि एम. अश्विनने प्रत्येकी तीन विकेट घेत या संघाची दाणादाण उडवली.

पंजाबच्या लाेकेशची ६९ चेंडूंत १४ चाैकारांसह १३२ धावांची खेळी; सत्रातील पहिले शतक साजरे किंग्ज इलेव्हनचा सलामीवीर आणि कर्णधार लाेकेश राहुलने गुरुवारी आयपीएलच्या १३ व्या सत्रामध्ये खणखणीत शतक साजरे केले. त्याने ६९ चेंडूंचा सामना करताना झंझावाती खेळीच्या बळावर १४ चाैकार आणि सात उत्तंुग षटकार ठाेकले. यासह त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली. यातून लाेकेश हा यंदाच्या सत्रामध्ये पहिला शतकवीर ठरला. त्याच्या आयपीएल करिअरमधील हे दुसरे शतक ठरले. त्याने गतवर्षी मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक ठाेकले हाेते.

बातम्या आणखी आहेत...