आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या काेकाे ग्राॅफ आणि नंबर वन इगा स्वातेकचा धक्कादायक पराभव झाला. या दाेघींनाही अवघ्या ३० मिनिटांच्या अंतरात स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. पराभवानंतर काेकाे ग्राॅफला माेठा धक्काच बसला. यामुळे मी अधिकच खचली आहे, अशी प्रतिक्रिया देत तिने आपल्या अश्रूंना वाट माेकळी करून दिली. त्यानंतर इगा स्वातेकनेही आपले मन माेकळे केले. मात्र, या धक्कादायक निकालामुळे आता महिला एकेरीचा गट संकटात सापडला आहे. कारण, या गटात अद्याप रंगतदार आणि अटीतटीचा सामना झाला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्येही प्रचंड नाराजीचे चित्र आहे. या गटात थेट धक्कादायक निकाल लागत असल्याने मानांकित खेळाडूंना झटपट पॅकअप करावे लागत आहे. यातून या गटातील किताबासाठीची खरी चुरसच आता राहिली नाही.
ग्रँडस्लॅम स्पर्धेदरम्यान धक्कादायक निकाल लागणे, हे काही नवीन नाही. असे निकाल हे सातत्याने या स्पर्धांदरम्यान लक्षवेधी ठरत असतात. डब्ल्यूटीए टूरमध्ये महिला एकेरीच्या गटात खास चुरस रंगताना दिसते. त्यामुळे किताबाची काेण महिला प्रबळ दावेदार आहे, याचा शेवटपर्यंत अचूक असा अंदाज बांधता येत नाही. मात्र, हेच चित्र ग्रँडस्लॅम स्पर्धेदरम्यान दिसत नाही. आता ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत महिला एकेरीच्या किताबासाठी नंबर वन इगा स्वातेकपाठाेपाठ अॅश्ले बार्टी, नाओमी ओसाका आणि सिमाेना हालेप प्रबळ दावेदार मानल्या जात हाेत्या. मात्र, बार्टीने निवृत्ती जाहीर केली. ओसाका ही सध्या मॅटर्निटी लीव्हवर आहे. तसेच हालेप ही डाेप टेस्ट पाॅझिटिव्हमुळे निकालाच्या प्रतीक्षेत आहे. यातून फक्त इगा स्वातेकवर सर्वांची नजर हाेती. मात्र, विम्बल्डन चॅम्पियन एलिना रायबकिनाने एकेरीच्या चाैथ्या फेरीत स्वातेकचा पराभव केला. यादरम्यान तिने पाॅवरफुल गेमच्या माध्यमातून हा सामना जिंकला. त्यामुळे स्वातेकला आपला पराभव टाळता आला नाही. यादरम्यान तिने पहिला सेट गमावल्यानंतर बाथरूम ब्रेक घेतला हाेता. मात्र, त्याचाही तिला काेणताच फायदा झाला नाही. २०१७ मधील फ्रेंच ओपन चॅम्पियन ओस्तापेंकाेने एकेरीच्या सामन्यात काेकाेचा पराभव केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.