आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑल इंग्लंड ओपन ​​​​​​​ बॅडमिंटन:लक्ष्य सेन उपविजेता, व्हिक्टरने जिंकला किताब

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा २० वर्षीय खेळाडू लक्ष्य सेनने गतवर्षी डिसेंबरपासून सुरू केलेली विजयी मोहीम कायम ठेवताना यंदाच्या सत्रात जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. याच पदकाने आत्मविश्वास दुणावलेल्या या खेळाडूने प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड आेपन बॅडमिंटन स्पर्धेची फायनल गाठली. यामध्ये ताे उपविजेता ठरला. नंबर वन व्हिक्टरने ५३ मिनिटांत लक्ष्य सेनवर २१-१०, २१-१५ ने मात केली. यासह व्हिक्टरने गत आठवड्यातील पराभवाची परतफेड केली.

लक्ष्य या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा भारताचा पाचवा बॅडमिंटनपटू ठरला. यापूर्वी भारताच्या प्रकाश पदुकोण (१९८०) व पी. गाेपीचंद (२००१) यांनी हे यश संपादन केले आहे. सत्राच्या शेवटी गाठू शकेल नंबर वनचे सिंहासन

वर्ल्ड चॅम्प यामागुचीने पहिल्यांदा जिंकला किताब
जपानची अकाने यामागुची ऑल इंग्लंड आेपनमध्ये चॅम्पियन ठरली. तिने रविवारी महिला एकेरीचा किताब पटकावला. तिने अंतिम सामन्यात कोरियाच्या सेयंगवर मात केली. दुसऱ्या मानांकित यामागुचीने ४४ मिनिटांत २१-१५, २१-१५ ने सामना जिंकला. यासह वर्ल्ड चॅम्पियन यामागुचीने करिअरमध्ये पहिल्यांदाच या स्पधॅेचा किताब पटकावला. दरम्यान, भारताच्या त्रेसा आणि गायत्रीला महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या जियान-झेंगने ५१ मिनिटांत भारताच्या जाेडीवर मात केली. त्यांनी २१-१७, २१-१६ ने सामना जिंकून दुहेरीची फायनल गाठली.

भारताचा २० वर्षीय लक्ष्य सेन सध्या लक्षवेधी कामगिरी करत आहे. त्याने गत चार वर्षांत आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. यातून आता त्याला आपल्या मेहनतीचे फळ मिळत आहे. मी गत चार वर्षांपासून त्याने केलेले अपार कष्ट पाहिले आहे. त्यामुळेच त्याला आता जागतिक स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करता येत आहे. त्याच्या खेळामध्ये प्रचंड सहनशीलता आहे. यामुळे त्याच्या कामगिरीचा दर्जा उंचावला. याच काैतुकास्पद कामगिरीमध्ये सातत्य ठेवत ताे यंदा सत्राच्या शेवटी जगातील नंबर वन बॅडमिंटनपटू हाेऊ शकेल. ही प्रचंड क्षमता त्याच्यात आहे.

त्याने सत्रामध्ये ऑलिम्पिक, वर्ल्ड आणि ऑल इंग्लंड आेपन चॅम्पियन खेळाडूंना धूळ चारण्याचे घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे सध्या बॅडमिंटनच्या विश्वात त्याच्याच नावाची चर्चा आहे. त्याच्या गेम पॅटर्न अटॅकिंग आहे. आक्रमक खेळीमुळे ताे प्रतिस्पर्धीवर सहज वरचढ ठरताे. मात्र, ही खेळी करताना फिटनेस हा उच्च दर्जाचा असावा लागताे. यासाठी त्याने प्रचंड मेहनत केली. त्यामुळे याच फिटनेसच्या बळावर आता ताे हाय लेव्हलची आक्रमक खेळी करताना दिसताे. ताे खेळताना आेव्हरहेड साइडवरून मारत असलेला क्राॅस कोर्ट स्मॅश हा जागतिक दर्जाचा मानला जाताे. ही शैली त्याने आत्मसात केली आहे. तसेच त्याच्यात काही गाेष्टी शिकण्याची आवड आहे, अशा शब्दांत कोच संजय मिश्रा यांनी लक्ष्य सेनवर काैतुकाचा वर्षाव केला. गत सत्रामध्येही त्याची कामगिरी लक्षवेधी ठरली हाेती. आता त्याने सर्वाेत्तम खेळी करताना बलाढ्य खेळाडूंना पराभूत केले.

बातम्या आणखी आहेत...