आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वेटरन अमेरिकन रेसलर आणि WWE सुपरस्टार द अंडरटेकरने रविवारी निवृत्ती घेण्याची घोषणा केली. अंडरटेकर रविवारी वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंट (WWE) सरवायवर सीरीज 2020 दरम्यान शेवटचे रिंगमध्ये दिसले. यावेळी त्यांनी आपल्या फेमस वॉकसह रिंगमध्ये एंट्री घेतली. 22 नोव्हेंबर 1990 ला डेब्यू करणाऱ्या अंडरटेकरने 22 नोव्हेंबर 2020 ला WWE ला निरोप दिला.
WWE ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे अंडरटेकरने एक पोस्ट केली. यात लिहीले की, रिंगमधील माझी वेळ संपली आहे. आता अंडरटेकरला निरोप द्या. यादरम्यान WWE लीजेंड द रॉक, जॉन सीना, ट्रिपल एच, शॉन मायकल्स, रिक फ्लेअर आणि केनसह अनेक सुपरस्टार उपस्थित होते. यावेळी सर्वांनी अंडरटेकरचे 30 वर्षांच्या करिअरसाठी आभार मानले.
"My time has come to let The @undertaker rest ... in ... peace." #SurvivorSeries #FarewellTaker #Undertaker30 pic.twitter.com/Mg9xr8GB94
— WWE (@WWE) November 23, 2020
1990 मध्ये खेळला होता पहिला सामना
अंडरटेकरने 22 नोव्हेंबर 1990 ला सरवायवर सीरीजद्वारे WWE मध्ये पदार्पण केले होते. अंडरटेकरने 7 वेळा WWE चॅम्पियनशिप आपल्या नावे केली आहे. आगळ्या-वेगळ्या रिंग वॉकद्वारे अंडरटेकरला ओळख मिळाली होती.
— Undertaker (@undertaker) November 22, 2020
एप्रिलमध्ये खेळला अखेरचा सामना
55 वर्षीय अंडरटेकरने WWE मध्ये आपला अखेरचा सामना रेसलमेनिया 36 मध्ये AJ स्टाइल्सविरोधात खेळला होता. या सामन्यात अंडरटेकरला विजय मिळाला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.