आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Laver Cup 2022; Roger Federer Before Retirement, On His Decision, Federer Said: After Much Thought, I Could Write About Retirement; Now The Focus Is On Finding A New Tennis Star From Switzerland

निवृत्तीवर फेडरर म्हणाला:खूप विचार केल्यानंतर, निवृत्तीबद्दल लिहू शकलो; आता लक्ष्य स्वित्झर्लंडचा नवा टेनिस स्टार शोधण्यावर

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रॉजर फेडरर म्हणतो की, मी निवृत्त होण्याचा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा मला वाटले की दुखापतीमुळे आता खेळणे शक्य होणार नाही. 20 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन फेडररने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते की 23 सप्टेंबरपासून सुरू होणारी लेव्हर कप ही त्याची शेवटची ATP स्पर्धा असेल. तो लेव्हर कपमध्ये दुहेरी सामना खेळणार आहे.

41 वर्षीय स्विस टेनिसपटू फेडरर म्हणाला, 'मागील तीन वर्षे माझ्यासाठी खूप कठीण होते. जेव्हा मी विम्बल्डन खेळलो तेव्हा पासून माझ्या लक्षात आलं की कोर्टपासूनचे माझं अंतर वाढत आहे. खरे सांगायचे तर, मी परत येण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी माझ्याही काही मर्यादा आहेत.

फेडररचे म्हणणे आहे की, त्याने निवृत्तीबाबत कोणतीही अशी विशिष्ट योजना आखलेली नाही. पण याबाबत त्याने संकेत दिले आहे की स्वित्झर्लंडमधून युवा टेनिस टॅलेंट बाहेर आणण्यासाठी आपण कोचिंग सुरू करणार आहोत. तो म्हणाला."मला स्वित्झर्लंडमधून नवीन टेनिस स्टार शोधायचा आहे,"

लेव्हर कपपूर्वी रॉजर फेडरर म्हणाला- 'काही महिन्यांपूर्वी माझे स्कॅन झाले होते आणि त्याचा रिपोर्ट माझ्या अपेक्षेप्रमाणे आला नाही. त्यावेळी मला वाटले की आता आपण निवृत्त व्हावं. मग निवृत्ती कधी आणि कशी जाहीर करायची हा प्रश्न होता. तो काळ खूप ताणतणावाचा होता.

आपल्या निवृत्तीच्या विचारांपासून मी नेहमी दूर राहिलो

फेडररने सोशल मीडियावर पाच पानी पत्र लिहून निवृत्ती जाहीर केली. फेडरर म्हणाला, 'या पत्रातील शब्द लिहिण्यासाठी मला अनेक आठवडे लागले. मला जे वाटत आहे ते मी शब्दात मांडावे अशी माझी इच्छा होती.

मी माझ्या निवृत्तीच्या विचारांपासून नेहमीच दूर राहिलो आहे. मी त्याबद्दल जास्त विचार केला असता तर तितक्या लवकर मी लवकर निरोप घेतला असता. त्यामुळे असे ठरवले ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी मी योग्य तो निर्णय घेईन

अपेक्षेपेक्षा जास्त साध्य केल्याचा आनंद आहे

फेडरर म्हणतो की मला इतकं यश मिळेल अशी कधी कल्पनाही केली नव्हती. खूप काही साध्य करू शकलो, त्यामुळे मी खूप आनंदी आहे.

स्वित्झर्लंडचा राजा म्हणून ओळखला जाणारा फेडरर हा 310 आठवडे जागतिक क्रमवारीत क्रमांक 1 राहिला आणि सलग 237 आठवडे अव्वल स्थानावर राहिला. त्याने 103 ATP एकेरी विजेतेपद पटकावले.

फेडररने 15 सप्टेंबर रोजी या सोशल पोस्टमध्ये निवृत्तीची घोषणा केली. तुम्ही पण वाचा...

बातम्या आणखी आहेत...