आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Lewandowski's Fastest Hat trick In 100th Match In Champions League Bayern Munich And Liverpool Quarter finals Marathi News

विक्रम:चॅम्पियन्स लीग बायर्न म्युनिच व लिव्हरपूल क्वार्टर फायनलमध्ये, 100 व्या लढतीत लेवानडोस्कीचा सर्वात वेगवान हॅट्ट्रिकचा विक्रम

म्युनिच/लिव्हरपूल7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बायर्नची साल्जबर्गवर 7-1 ने मात, लिव्हरपूल 0-1 ने पराभूत

जर्मन क्लब बायर्न म्युनिच आणि इंग्लिश क्लब लिव्हरपूल यांनी युरोपातील सर्वात मोठ्या फुटबॉल चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. बायर्न म्युनिच सर्वाधिक २० व्या वेळी लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला बायर्न म्युनिचने घरचे मैदान अलियांझ अरेना येथे ऑस्ट्रियन क्लब आरबी साल्झबर्गचा दुसऱ्या लेगमध्ये ७-१ असा पराभव केला. लीगच्या चालू सत्रात बायर्नचा हा सर्वात मोठा विजय आहे. दोन्ही लेगनंतर एकूण ८-२ गोल संख्या बायर्नच्या बाजूने राहिली. जर्मन क्लबसाठी रॉबर्ट लेवाडोस्कीने १२ व्या (पेनल्टी), २१ व्या (पेनल्टी), २३ व्या मिनिटाला गोल करत हॅट््ट्रिक पूर्ण केली. लीगच्या इतिहासातील ही सर्वात वेगवान हॅट््ट्रिक ठरली. त्याने मिलानच्या मार्को सिमोनचा १९९६ मध्ये रोझेनबर्गविरुद्ध २४ मिनिटांत हॅट््ट्रिक करण्याचा विक्रम मोडला. चॅम्पियन्स लीगमधील लेवाडोस्कीचा हा १०० वा सामना होता. त्याचबरोबर, सर्ज नेबरीने ३१ व्या मिनिटाला, थॉमस मुलरने ५४ व्या व ८३ व्या मिनिटाला आणि लेरॉय सानेने ८५ व्या मिनिटाला गोल केले. लेवाडोस्कीची लीगमधील ही पाचवी आणि बाद फेरीतील दुसरी हॅट््ट्रिक ठरली आहे.

बातम्या आणखी आहेत...