आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकडून संधी न मिळाल्याने गाेव्याकडून खेळताेय:सचिनप्रमाणेच अर्जुन तेंडुलकरचे पहिल्याच रणजी सामन्यात शतक

पणजी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जसा पिता तसाच पुत्र याचा प्रत्यय बुधवारी आला. क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याने आपल्या पहिल्याच रणजी करंडक सामन्यात राजस्थानविरुद्ध २२० चेंडूत १२० धावा (१६ चौकार, २ षटकार) केल्या. ३४ वर्षांपूर्वी सचिननेही आपल्या पहिल्याच रणजी सामन्यात गुजरातविरुद्ध पदार्पण करताना १२९ चेंडूत नाबाद १०० धावा (१४ चौकार) केल्या होत्या. मायलेकांचे मिळून प्रथम श्रेणी सामन्यात ८२ शतके झाली आहेत. त्यात सचिनचे ८१ आहेत. माजी कसोटीपटू लाला अमरनाथ व त्यांचे पुत्र मोहिंदर व सुरिंदर यांची प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण ४६ शतके आहेत.

बातम्या आणखी आहेत...