आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंग प्‍लेअर ऑफ द वीक:जॉर्जियात 8  महिने अडकली होती लिंथोई, शेतीकाम शिकली

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाव : लिंथोई चनंबम वय : १६ खेळ : ज्युदो देश : भारत

मणिपूरची १६ वर्षीय लिंथोई चनंबमने वर्ल्ड कॅडेट ज्युदो चॅम्पियनशिप सुवर्ण जिंकले होते.

मागील वर्षी मार्चमध्ये जॉर्जियात ज्युदो इंटरनॅशनल ग्रांप्री आयोजित केली होती. यात लिंथोईही सहभागी होती. परंतु त्यानंतर कोरोनामुळे जगभर लॉकडाऊन लागले होते. त्यामुळे ती सुमारे आठ महिने तेथे अडकून पडली होती आणि स्पर्धाही रद्द झाली होती. लिंथोई आपली सहकारी खेळाडू देव थापा आणि जसलीन सैनीसोबत तेथे अडकली आणि तिच्याकडे कुटुंबीयांसोबत बोलण्यासाठी पैसेही नव्हते. जॉर्जियाचे प्रमुख ज्युदो प्रशिक्षक मामुका किजिलाशविली यांनी भारतीय खेळाडूंची केवळ राहण्याचीच व्यवस्था केली असे नव्हे तर त्यांना प्रशिक्षणही दिले. लिंथोईने सांगितले की, जॉर्जियात अडकले तेव्हा ज्युदोच्या प्रशिक्षकासोबत ती शेतीकामही शिकली. लिंथोईने मणिपूरच्या मायांगमध्ये ज्युदो शिकण्यास सुरुवात केली होती. तिचे वडील मत्स्यपालन करतात. आई गृहिणी आहे. काका व वडिलांनी खेळण्यासाठी प्रोत्साहित केले.

लिंथोईने २०२१ मध्ये नॅशनल कॅडेट ज्युदो चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकलेे. २०२२ एशियन कॅडेट व ज्युदो ज्युनियरमध्येही सुवर्ण जिंकले.

बातम्या आणखी आहेत...