आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Lionel Messi And Argentina Players Will Live Here During The World Cup, See Photos

FIFA विश्वचषक-2022:विश्वचषकादरम्यान लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना संघाच्या खेळाडूंचे वास्तव्य येथे असणार, पाहा फोटोज

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

20 नोव्हेंबरपासून फुटबॉलची सर्वात मोठी स्पर्धा सुरू होत आहे. विश्वचषकातील पहिला सामना यजमान देश कतार आणि इक्वेडोर यांच्यात होणार आहे. यावेळी विश्वचषकाचा सोहळा 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबरपर्यंत रंगणार आहे.

यावेळी एकूण 32 संघ खेळणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी फिफा विश्वचषकादरम्यान लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना संघाचे खेळाडू एका फाइव्ह स्टार हॉटेल किंवा रिसॉर्टला न थांबता कतार विद्यापीठातील वसतिगृहात राहत आहेत.

20 नोव्हेंबरपासून फुटबॉलची सर्वात मोठी स्पर्धा सुरू होत आहे. विश्वचषकातील पहिला सामना यजमान देश कतार आणि इक्वेडोर यांच्यात होणार आहे. यावेळी विश्वचषकाचा सोहळा 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबरपर्यंत रंगणार आहे. यावेळी एकूण 32 संघ खेळणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी फिफा विश्वचषकादरम्यान लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना संघाचे खेळाडू एका फाइव्ह स्टार हॉटेल किंवा रिसॉर्टला न थांबता कतार विद्यापीठातील वसतिगृहात राहत आहेत.

एका अधिकाऱ्याने डेली मेलला सांगितले की, 'आम्ही अनेक वेळा कॅम्पसला भेट दिली आणि ते निवडले कारण त्यात केवळ उत्कृष्ट सुविधाच नाहीत तर आपल्या असडोससाठी मोकळी जागाही आहे. खेळाडूंसाठी आणि सर्वसाधारणपणे अर्जेंटिनासाठी हे खूप महत्त्वाचे आहे, ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे.

अधिकारी पुढे म्हणाला "आम्ही त्यांना कतारमध्ये वास्तव्य करीत असताना त्यांना स्वताच्या घरासारखे अनुभवू मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे फुटबॉलवर लक्ष केंद्रित करताना त्यांना घरासारखी चव मिळेल याची खात्री करणे,"

अर्जेंटिनाला आतापर्यंत दोन वेळा विश्वचषक जिंकण्यात यश आले आहे. 1978 आणि 1966 मध्ये अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकण्यात यश मिळवले आहे. तर यावेळी लिओनेल मेस्सीचा संघ 22 नोव्हेंबरला सौदी अरेबियासोबत पहिला सामना खेळणार आहे.

फुटबॉल विश्वचषक 2022 ग्रुप

ग्रुप-ए- कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड

ग्रुप-बी- इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स

ग्रुप -सी- अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड

ग्रुप: डी- फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया

ग्रुप-ई- स्पेन, कोस्टारिका, जर्मनी, जपान

ग्रुप-एफ- बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया

ग्रुप जी -ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून

ग्रुप-एच - पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया प्रजासत्ताक

बातम्या आणखी आहेत...