आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने अत्यंत रोमहर्षक पद्धतीने जेतेपदावर नाव कोरलं. अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणारा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची सध्या जगभरात चर्चा आहे. संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर मेस्सीचा आनंद गगनात मावेनासा झाला. मेस्सीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
त्याने लिहिले की, 'मी अनेक वेळा हे स्वप्न पाहिले. मला हे इतके हवे होते की मी कधीच खचलो नाही. माझा यावर विश्वास बसत नाही आहे. कायम मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या कुटुंबाचा आणि आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जेव्हा आम्ही एकत्र येतो आणि लढतो. तेव्हा ते आम्ही पुर्ण करतो. हे आम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. हे एका व्यक्तीची नाही तर एका संपुर्ण गटाचे यश आहे. एका स्वप्नासाठी आम्ही लढलो, हेच स्वप्न अर्जेंटिनाचे होते, हीच आमची ताकद होती. आम्ही ते करुन दाखवलं'.
लिओनेल मेस्सीची पत्नीही अँटोनेला रोकुझोलानेही पती व मुलांबरोबरचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने म्हटलं की, वर्ल्ड चॅम्पियन्स...मला सुरुवात कशी करावी हे देखील कळत नाही आहे... तुमचा आम्हाला मोठा अभिमान आहे. आम्हाला कधीही हार न मानता शेवटपर्यंत लढायचे शिकवलं. धन्यवाद.. शेवटी हे झाले की तुम्ही जगज्जेता ठरला, आम्हाला माहित आहे की तुम्ही इतकी वर्ष काय सहन केलं. तुला हे काय साध्य करायचे होते !!! चला अर्जेंटिनाला जाऊया.
मी निवृत्त होत नाहीये:विश्वचषक विजयानंतर मेसी म्हणाला
फुटबॉल विश्वचषक विजयानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेसीने आपण निवृत्ती घेणार नसल्याचे सांगितले. अंतिम सामन्यापूर्वी अर्जेंटिनाने सांगितले होते की, मेसी विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेईल. Goal.com च्या रिपोर्टनुसार, सामन्यानंतर मेसीने सांगितले की, तो अर्जेंटिना संघातून निवृत्त होत नाहीये. त्याला आता राष्ट्रीय संघाकडून चॅम्पियनप्रमाणे खेळायचे आहे. यावेळी आपण ही स्पर्धा जिंकणार असल्याची भावना मनात होती असे त्याने सांगितले. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मेसी आजारी होता... तेव्हा बार्सिलोनाने केली मदत
मेसीला लहानपणी ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी (GHD) या गंभीर आजाराने ग्रासले होते आणि डॉक्टरांनी त्याला फुटबॉल खेळता येणार नसल्याचे सांगितले होते. या आजारात शरीराची वाढ खुंटते. आजच्या कथेत आपण मेसीच्या संघर्षाची कहाणी जाणून घेणार आहोत... त्याआधी पाहा तो क्षण, ज्याची मेसी अनेक वर्षांपासून वाट पाहत होता... संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्जेंटिना चॅम्पियन, पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव
अर्जेंटिना फुटबॉलचा नवा जगज्जेता बनला आहे. गतविजेत्या फ्रान्सला 3-3 च्या बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवत 36 वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियन ठरला. अर्जेंटिनाच्या मेसीने पेनल्टीवर पहिला गोल केला. दुसरा एंजेल डी मारियाने केला. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये किलियन एमबापेने 97 सेकंदांत 2 गोल केले. सामना एक्स्ट्रा टाइममध्ये गेला. पहिल्या 15 मिनिटांत एकही गोल झाला नाही, पण पुढच्या 15 मिनिटांत मेसीने गोल करत अर्जेंटिनाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. मग एमबापेने पेनल्टीवर गोल करत सामना 3-3 ने बरोबरीवर आणला. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना जिंकला. अशा प्रकारे फुटबॉलमधील युरोपची जादूही 20 वर्षांनंतर ओसरली. चषक युरोपच्या बाहेर गेला. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
विश्वविजेत्या अर्जेंटिनाला मिळाले 348 कोटी रुपये
FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. चॅम्पियन संघाला 348 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम ($42 दशलक्ष) मिळाले. अंतिम फेरीत हरल्यानंतर उपविजेते ठरलेल्या फ्रान्सलाही 248 कोटी रुपये मिळाले. स्पर्धेत सहभागी झालेल्या 32 संघांमध्ये एकूण 1346 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेतील सर्व 32 संघांना किती बक्षीस रक्कम मिळाली हे जाणून घेऊया... संपुर्ण बातमी येथे वाचा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.