आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ब्ज हाएस्ट पेड खेळाडू 2022:फुटबाॅलपटू विश्वातील सुपरस्टार लिहोनेल मेसी 1000 कोटींची कमाई करणारा जगातील पहिला खेळाडू

न्यूयॉर्क9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉलच्या विश्वातील सुपरस्टार लिहोनेल मेसीने मैदानापाठोपाठ फोर्ब्जच्या यादीतही वर्चस्व गाजवले. अर्जेंटिनाच्या या फुटबॉलपटूने सर्वाधिक कमाई करणारा पहिला खेळाडू होण्याचा बहुमान पटकावला. फोर्ब्जच्या वार्षिक यादीत फ्रेंच क्लब पीएसजी सुपरस्टार फाॅरवर्ड मेसीच्या नावे १००० कोटींच्या कमाईची नाेंद झाली. यासह त्याने सर्वाधिक कमाईमध्ये मिक्स मार्शल आर्टिस्ट कोनाेर मॅक्ग्रगोरला मागे टाकले. त्यामुळे आयर्लंडचा हा खेळाडू सर्वाधिक कमाईच्या टाॅप-१० मधून बाहेर पडला.

यंदा एकूण कमाई तिसऱ्यांदा सर्वाधिक

यंदा १० पेक्षा अधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंनी एकूण ७६८८ कोटींची कमाई केली. यामध्ये २०२१ च्या तुलनेमध्ये ६ टक्के घसरण झाली. यातूनच मॅक्ग्रेगोरला टाॅप-१० मधून बाहेर पडावे लागले. यंदा टाॅप-१० खेळाडूंची एकूण कमाई ही तिसरी सर्वाधिक ठरली आहे. २००८ मध्ये ८२१० कोटी व २०२१ मध्ये ८१३० कोटींची कमाई नाेंद झाली.

टॉप-10 सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू
(खेळाडू / रक्कम / खेळ)

  • लियोनेल मेसी 1007 फुटबॉल
  • लेब्रन जेम्स 940 बास्केटबॉल
  • रोनाल्डो 890 फुटबॉल
  • नेमार 736 फुटबॉल
  • स्टीफन करी 720 बास्केटबॉल
  • केविन डुरंट 714 बास्केटबॉल
  • राॅजर फेडरर 703 टेनिस
  • सी अल्वारेज 697 बॉक्सिंग
  • टॉम ब्रेडी 650 अमेरिकन

फुटबॉल
ए. जियानिस 627 बास्केटबॉल
(रक्कम कोटी रुपयांत)

7688 कोटींचे वार्षिक उत्पन्न आहे टाॅप-१० मधील खेळाडूंचे १२ महिन्यातील; गत वर्षीच्या तुलनेत ६% अधिक.

04 खेळाडू हे फुटबॉल व बास्केटबॉलमधील आहेत टाॅप-१० मध्ये. प्रत्येकी एक आहे टेनिस, बॉक्सिंगमधील

बातम्या आणखी आहेत...