आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्जेंटिना फुटबॉल संघाचा स्टार आणि अनुभवी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला लॉरेस स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पॅरिसमध्ये सोमवारी झालेल्या समारंभात त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच अर्जेंटिना संघाला लॉरेस वर्ल्ड टीम ऑफ द इयर घोषित करण्यात आले. यासह मेस्सी हा पहिला खेळाडू बनला आहे, ज्याला एकाच वेळी स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयर आणि टीम ऑफ द इयर असे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत.
गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या फिफा विश्वचषक जिंकल्याबद्दल मेस्सी आणि अर्जेंटिनाला हा सन्मान देण्यात आला. कतार येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मेस्सीने आपल्या संघासाठी दोन महत्त्वाचे गोल केले होते. विजेत्याचा निर्णय पेनल्टीद्वारे झाला होता. निर्धारित वेळेत दोन्ही संघ ३-३ असे बरोबरीत होते. त्यानंतर अर्जेंटिनाने पेनल्टीवर फ्रान्सचा पराभव केला. मेस्सीच्या कारकिर्दीतील हे पहिलेच विश्वचषक विजेतेपद आहे.
मेस्सीला दुसऱ्यांदा लॉरियस स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयर हा किताब
मेस्सीला दुसऱ्यांदा लॉरियस स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला आहे. याआधी 2020 मध्ये त्याला फॉर्म्युला वन ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन सोबत हा पुरस्कार देण्यात आला होता.
लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारांसाठी निवड कशी केली जाते?
लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्ससाठी, खेळाडू आणि संघांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर जागतिक माध्यमांद्वारे प्रथम नामांकन दिले जाते. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अकादमीचे 71 सदस्य त्यानंतर बहुसंख्य मतांनी खेळाडू आणि संघांची विविध पुरस्कारांसाठी निवड करतात. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्सची स्थापना सन 2000 मध्ये झाली. तेव्हापासून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.