आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालियाेनेल मेसीने (३५ वा मि.) आपल्या चमत्कारीक गाेलच्या बळावर अर्जेंटिना फुटबाॅल संघाची फिफा विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नपूर्तीकडची आगेकूच कायम ठेवली. यातूनच अर्जेंटिना संघाला शनिवारी मध्यरात्री वर्ल्डकपची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली. अर्जेंटिना संघाने २-१ अशा फरकाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अर्जेंटिनाच्या विजयात अल्वारेजनेही (५७ वा मि.) एका गाेलचे माेलाचे याेगदान दिले. दरम्यान अर्जेंटिनाच्या फर्नांडेझने प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर एका गाेलची नाेंद केली. त्याने ७७ व्या मिनिटाला आत्मघाती गेला केला. यादरम्यान अर्जेंटिनाच्या कर्णधार मेसीने आपल्या करिअरमध्ये १ हजाराव्या सामन्यात गाेल करण्याचा पराक्रम गाजवला. त्याने अर्जेंटिना संघाकडून १६९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. बार्सिलाेना क्लबकडून ७७८ आणि पॅरिस सेंट जर्मनकडून ५३ सामने खेळले आहेत. अर्जेंटिना संघाने दमदार सुरुवात करताना शेवटच्या मिनिटांपर्यंत दबदबा कायम ठेवला.
मेसी...एकमेव स्टार मेसीचे सामने ‘10’00 एकूण गाेल 789 असिस्ट 338 जिंकलेल्या ट्राॅफी 41 गोल्डन बॉल 07 ऑलिम्पिक पदक 01
मेसीचा ९ वा गाेल लियाेनेल मेसीने आपल्या वर्ल्डकप करिअरमध्ये ९ वा गाेल केला. यासह त्याच्या नावे आता राष्ट्रीय संघाकडून विक्रमाची नाेंद झाली. ताे विश्वचषकात सर्वाधिक ९ गाेल करणारा अर्जेंटिना संघाचा दुसरा फुटबाॅलपटू ठरला आहे.
विक्रम : कुओल वयाच्या १८ व्या वर्षी बाद फेरी सामना खेळला ऑस्ट्रेलियाच्या १८ वर्षीय गारंग कुओलने फुटबाॅलच्या विश्वात नव्या विक्रमाची नाेंद केली. ताे वर्ल्डकपच्या बाद फेरीचा सामना खेळणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. जगातील प्रसिद्ध फुटबाॅलपटू पेले यांच्या नावे १७ वर्ष २५९ दिवसांचा असताना सामना खेळण्याचा युवा खेळाडूचा विक्रम नाेंद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.