आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Lionel Messi's Second Five Goals, Fourth In Most Goals; Ronaldo Tops The List

फुटबॉल:लियोनेल मेसीचे दुसऱ्यांदा पाच गोल, सर्वाधिक गोलमध्ये चौथ्या स्थानी; रोनाल्‍डो अव्वल स्थानावर

साओ पावलोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरस्टार लियोनेल मेसीने (८, ४५, ४७, ७१, ७६ वा मि.) एकट्याने मैदान गाजवत आपल्या अर्जेटिना फुटबॉल संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. मेसीच्या गोलच्या बळावर अर्जेटिना टीमने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात एस्टाेनियाचा पराभव केला. अर्जेटिनाने ५-० ने विजय संपादन केला. अर्जेटिनाच्या ३४ वर्षीय मेसीने दुसऱ्यांदा एकाच सामन्यात पाच गोल करण्याचा पराक्रम गाजवला. यापूर्वी त्याने २०१२ मध्ये चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या बेअर लेवरकुसेनविरुद्ध सामन्यात हे यश संपादन केले हाेते. यासह ताे सर्वाधिक गोल करणाऱ्या यादीत चौथ्या स्थानी आहे. यामध्ये पाेर्तुगालचा क्रिस्टियानाे रोनाल्‍डो हा अव्वलस्थानावर आहे.

यादरम्यान मेसीने आपल्या करिअरमध्ये ५६ व्यांदा गोलची हॅट्ट्रिक नोंदवली. तसेच सर्वाधिक हॅट््ट्रिकमध्ये मेसी हा तिसरा फुटबॉलपटू ठरला. रोनाल्‍डो (६०) दुसऱ्या आणि पेले (९२) अव्वल स्थानी आहे.

बातम्या आणखी आहेत...