आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Liverpool Are The League Champions After 30 Years, With The Most Matches, 7 Premier League Matches Left

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबाॅल:लिव्हरपूल क्लब ३० वर्षांनी लीग चॅम्पियन, सर्वाधिक सामने राखून सरस, प्रीमीयर लीगचे सध्या ७ सामने शिल्लक

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लिव्हरपूल यंदा सत्रातील प्रीमियर लीग चॅम्पियन बनला. लिव्हरपूलने ३० वर्षे, ११४९ सामने आणि एक लाख ३४१० मिनिटानंतर (अतिरिक्त वेळेचा समावेश नाही) इंग्लंडची अव्वल फ्लाइट लीगचा किताब जिंकला. त्याने लीगमध्ये सर्वाधिक सामने शिल्लक ठेवून चॅम्पियन बनवण्याचा विक्रम बनवला. त्याचे लीगमध्ये अद्याप ७ सामने बाकी आहेत. लिव्हरपूलची टीम १९ व्या वेळी इंग्लंड फुटबॉल चॅम्पियन बनली. लिव्हरपूल सर्वाधिक किताब जिंकण्याच्या बाबतीत दुसऱ्यास्थानी आहे. मँचेस्टर युनायटेड २० किताबांसह अव्वल स्थानी आहे. गुरुवारी रात्री चेल्सीने मँचेस्टर सिटीला २-१ ने हरवले. प्रीमियर लीगच्या तालिकेत लिव्हरपूल ८६ गुणांसह अव्वल आणि दुसऱ्या स्थानावरील मँचेस्टर सिटीचे ६३ गुण आहेत.

  {क्लबच्या घरच्या स्टेडियम एनफिल्ड बाहेर चाहते सोशल डिस्टन्सिंग विसरून झाले सहभागी{ चेल्सीने मँचेस्टर सिटीला २-१ ने पराभूत करताच नंबर वन टीम लिव्हरपूलने किताब मिळवला १९ व्या किताबासाठी १३ हजार ७८० कोटी खर्च, २३९ खेळाडूंना आजमावले : लिव्हरपूल १९८९-९० नंतर पहिल्यांदा चॅम्पियन बनला. या १९ व्या किताबासाठी त्यांनी ३० वर्षांत २३९ खेळाडूंना आजमावले आणि जवळपास १३ हजार ७८० कोटी रुपये खर्च केले. त्यांनी ९ नियमित प्रशिक्षक बदलले. विजेतेपदाचा जल्लाेष करताना खेळाडू.

बातम्या आणखी आहेत...