आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वोत्तम स्ट्राइक फोर्सच्या बळावर यंदा लिव्हरपूल क्लबला एफए कप फुटबाॅल स्पधॅेत आपला दबदबा कायम ठेवता आला. यातूनच या क्लबला अंतिम फेरीचा पल्ला गाठता आला. आता हाच क्लब किताबाचा प्रबळ दावेदार आहे. यादरम्यान क्लबच्या सालाहची कामगिरी सर्वोत्तम ठरेल. तोच संघाच्या विजेतेपदासाठीचा हीरो ठरेल, असा विश्वास इंग्लंडचे माजी फुटबाॅलपटू डॉन (डाेनाल्ड) हचिसन यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केला. वेंबले स्टेडियमवर लिव्हरपूल व चेल्सी यांच्यात आज शनिवारी एफए कप स्पर्धेची फायनल होणार आहे. चेल्सीने आतापर्यंत ८ व लिव्हरपूलने ७ वेळा चॅम्पियन राहण्याचा बहुमान पटकावला आहे.
-लिव्हरपूल क्लबची मजबूत बाजू काय आहे?
लिव्हरपूलकडे युरोपातील बेस्ट स्ट्राइक फोर्स आहे. या क्लबचा सुपरस्टार सालाह हा गत तीन वर्षांपासून फाॅर्मात आहे. संघात लुइस डियाज, राॅबर्टो फरमिनाे आणि डियागो जोटासारखे सुपरस्टार खेळाडूही आहेत. साडियो माने सर्वोत्तम खेळीतून स्वत:ला सिद्ध करत आहेत. आक्रमक खेळी हीच क्लबची मजबूत बाजू मानली जाते.
-कोच क्लाेप यांच्यामुळे क्लबमध्ये मोठा बदल, याबद्दल काय मत?
क्लाेप यांचे यश हे अविश्वसनीय आहे. तो फारच समजदार आणि हुशार आहे. प्रतिस्पर्धी संघ पाहून ते आपल्या क्लबचा डावपेच आखतात. त्यामुळेच या क्लबने सकारात्मक अशी मोठी प्रगती साधली आहे. गत चार वर्षांपासून या क्लबने मोठे यश संपादन केले आहे. त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
-फायनलमध्ये एक्स फॅक्टर कोण असेल?
लिव्हरपूल क्लबकडून फायनलमध्ये साडियो माने, डियाज आणि सालाह हे एक्स फॅक्टर ठरतील. तसेच चेल्सीसाठी हावर्ट््ज, मेसन माउंट आणि टीमो वेर्नर हेही एक्स फॅक्टर ठरू शकतील. हे दोन्ही तुल्यबळ क्लब आहेत. त्यामुळे ही फायनल चाहत्यांच्या डाेळ्याचे पारणे फेडू शकणारी ठरेल, असे सध्या चित्र आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.