आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Lockdown Escalates In Japan, After The IPL, The Olympics May Now Be Canceled

कोरोनाचा कहर:जपानमध्ये लॉकडाऊन वाढले, आयपीएलनंतर आता ऑलिम्पिक स्पर्धाही होऊ शकते रद्द

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे जपानने लॉकडाऊन वाढवला ​​आहे. यानंतर आता 23 जुलै 2021 पासून सुरू होणारे महाकुंभ ऑलिम्पिक रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतातही मंगळवारी आयपीएल -2021 अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे रद्द करण्यात आले आहे.

जपान सरकारने देशातील कोरोनाचा प्रभाव वाढल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ओकियो, ओसाका, क्योटा आणि ह्योगो या जपानमधील अनेक मोठ्या शहरांमध्ये 23 एप्रिल ते 11 मे दरम्यान लॉकडाऊन लावण्यात आले आहे. परंतु कोरोना संक्रमणास संपूर्ण ब्रेक लावण्यासाठी हे लॉकडाउन वाढवण्याचा अधिकारी विचार करीत आहेत.यामुळे ऑलिम्पिक खेळांना धोका निर्माण झाला आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील होणारी स्पर्धा कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे 23 जुलै 2021 पर्यंत स्थगित करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...