आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जपानमध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या सार्वजनिक सर्व्हेनुसार ८० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना वाटते की, यंदाचे टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलले जावे किंवा रद्द केले जावे. याबाबतचा निर्णय हा यजमान जपानला माेठा धक्का देणारा ठरेल. असे झाल्यास जपानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. अर्थ तज्ज्ञांनुसार, टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा रद्द केल्यास ४.५ ट्रिलियन येनचे (जवळपास ३.१५ लाख कोटी रुपये) नुकसान होईल. यात सरकार, आयोजन समिती, हॉस्पिटॅलिटी क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, हाॅटेल, स्थानिक बाजार आदींच्या नुकसानीचा समावेश आहे. मात्र, स्पर्धा पुढे ढकलल्याने यापूर्वीच जवळपास ४२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण, स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या क्रीडा साहित्य व सुविधांच्या देखभालीचा खर्च वाढला आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी आयोजक नवे पर्याय शोधत आहे. त्यांच्यानुसार, स्पर्धा पुढे ढकलल्या किंवा रद्द झाल्यास ४८० मिलियन डॉलर (जवळपास ३५०० कोटी रुपये) इन्शुरन्समधून मिळतील.याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऑलिम्पिकच्या तयारीच्या चाचणीसाठी बेसबॉलचे आयोजन करण्यात आले
आयोजकांनी ऑलिम्पिकच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात ऑलिम्पिकची दोन ठिकाणे टोकिओ व योकोहामामध्ये बेसबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला. प्रेक्षकांमध्ये एक आसन रिकामे सोडण्यात आले होते. त्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले होते. ठिकठिकाणी सॅनिटायझर स्टेशन तयार करण्यात आले हाेते.
स्पर्धा वर्षभरापासून स्थगित झाल्यानंतर तयार मैदानांच्या देखभालीवर अधिक खर्च हाेत आहे.
लवकर निर्णय घ्यावा : खेळाडू
जपानचे खेळाडू स्पर्धा आयोजित करावी किंवा नाही, या वादापासून अंतर राखून आहेत. त्यांच्या मते, हा राजकीय प्रश्न आहे, जो लवकर सुटला पाहिजे. खेळाडूंसाठी सर्वात मोठा मुद्दा अनिश्चिततेचा आहे. ते म्हणतात, जर स्पर्धा जुलैमध्ये होणार असेल, तर त्या पद्धतीने तयारी करावी लागेल. होणार नसेल तर तयारीत बदल करावा लागेल.
आयाेजन खर्चात हाेतेय वाढ
टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा आयाेजानचा सुरुवातीचा खर्च २५ बिलियन डॉलर ( १ लाख ८२ हजार कोटी) होता. यासाठीचा निधीही मंजुर आणि उपलब्ध झाला हाेता. मात्र, मार्च महिन्यात जगभरात काेराेनाने धुमाकुळ घातलाा. याच महामारीमुळे स्पर्धा एका वर्षासाठी पुढे ढकलावी लागली. याचा आर्थिक स्वरूपात माेठा धक्का बसला.
ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार ऑलिम्पिक : आयआेसी
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) व आयोजन समिती नुसार, ऑलिम्पिक निश्चित वेळेत पार पडेल. प्रेक्षकांच्या प्रवेशावर शंका आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.