आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाॅक्सिंग:लवलिना, परवीन, स्वीटीने जिंकले सुवर्णपदक

अम्मान4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिक पदक विजेती बाॅक्सर लवलिना बाेरेगाेहाई, परवीन आणि स्वीटी शुक्रवारी एशियन बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. त्यांनी आपापल्या वजन गटामध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. लवलिनाने आपल्या ७५ किलाे वजन गटाच्या फायनलमध्ये उझबेकिस्तानच्या रुजमेताेवा साेखीबाला धूळ चारली. तिने ५-० ने सामना जिंकून सुवर्णपदक आपल्या नावे केले. यासह तिच्या नावे या स्पर्धेत तिसऱ्या पदकाची नाेंद झाली. तिने यापूर्वी २०१७ आणि २०२१ मध्ये या स्पर्धेच्या वेल्टरवेट गटामध्ये प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकले हाेते. तसेच परवीनने ६३ किलाे वजन गटाच्या फायनलमध्ये जपानच्या किटाे माईला धूळ चारली. तिने ५-० ने सामना जिंकला. यासह ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली. स्वीटीने ८१ किलाे वजन गटाच्या अंतिम सामन्यात कझाकिस्तानच्या गुलसायावर मात केली. तिने ५-० ने एकतर्फी विजय संपादन केला.

बातम्या आणखी आहेत...