आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या विजयासह लखनऊ अव्वलस्थानी:लखनऊची 5 गड्यांनी हैदराबाद संघावर मात

लखनऊ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर कृणाल पंड्याने (३ बळी, ३४ धावा) अष्टपैलू खेळीतून यजमान लखनऊ सुपरजायंट्स संघाला आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळवून दिला. कर्णधार लाेकेश राहुलच्या (३५) नेतृत्वाखाली लखनऊ संघाने लीगमधील आपल्या तिसऱ्या सामन्यात मार्करामच्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा पराभव केला. लखनऊ संघाने इकाना स्टेडियमवर ५ गड्यांनी सामना जिंकला. या दुसऱ्या विजयाच्या बळावर लखनऊ संघाने गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर धडक मारली. यामुळे गतचॅम्पियन गुजरात टायटन्स संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. यादरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाचा मार्करामच्या नेतृत्वात पुनरागमन करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामाेरे जावे लागले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाला निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावत १२१ धावा काढता आल्या. प्रत्युत्तरात यजमान लखनऊ संघाने १६ षटकांमध्ये ५ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले. यासह संघाने अव्वल स्थान गाठले. संघाच्या विजयासाठी सामनावीर कृणाल पंड्या आणि लाेकेश राहुलची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. यामुळे संघाला झटपट विजय साजरा करता आला. त्यामुळे लखनऊ संघाला गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावरून थेट नंबर वन हाेता आलेे.

कृणाल-लाेकेशची अर्धशतकी भागीदारी : लखनऊ संघाच्या विजयासाठी सामनावीर कृणाल आणि कर्णधार लाेकेश राहुलने झंझावाती खेळी केली. लाेकेश राहुलने सलामीवीर मेयर्ससाेबत (१३) संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी ३५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर दीपक हुडा (७) स्वस्तात बाद झाला. दरम्यान, कृणाल व लाेकेशने ५५ धावांची विजयी भागीदारी रचली.