आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली संघाला 143 धावांवर राेखले:लखनऊ संघाचा विजय; दिल्ली सलामीला पराभूत

लखनऊ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर मार्क वूड (५/१४), आवेश खान (२/२९) आणि रवी बिश्नाेईने (२/३१) आपल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला शनिवारी आयपीएलमध्ये दणदणीत विजयाचे खाते उघडून दिले. लाेकेश राहुलच्या नेतृत्वाखाली यजमान लखनऊ संघाने आपल्या घरच्या मैदानावर डेव्हिड वाॅर्नरच्या दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. लखनऊ संघाने ५० धावांनी सामना जिंकला.

कायले मेयर्सच्या (७३) शानदार अर्धशतकाच्या बळावर लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १९३ धावा काढल्या. प्रत्युत्तरामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला निर्धारित २० षटकांत ९ गड्यांच्या माेबदल्यामध्ये १४३ धावांपर्यंत मजल मारता आली. पाच बळी; वुड पहिला गाेलंदाज : मार्क वूडने विक्रमाला गवसणी घातली. लखनऊच्या या गाेलंदाजाने डावात ५ बळी घेतले. यामुळे ताे यंदा सत्रामध्ये डावात सर्वाधिक ५ विकेट घेणारा पहिला गाेलंदाज ठरला.