आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Madhya Pradesh First Ranji Champion; Mumbai Team Runners up For The Sixth Time

विक्रमी यश:मध्य प्रदेश पहिल्यांदा रणजी चॅम्पियन; मुंबई टीमला सहाव्यांदा उपविजेतेपद

बंगळुरूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्य प्रदेशचा शुभम वर्मा (११६,३०) सामनावीर मुंबईचा सरफराज खान (९८२) मालिकावीर

माजी कर्णधार व प्रशिक्षक चंद्रकांत पंडितचे अचूक मार्गदर्शन, कर्णधार आदित्य श्रीवास्तवच्या कुशल नेतृत्वाखाली मध्य प्रदेश संघाने बंगळुरूच्या एम. चिन्नास्मावी मैदानावर इतिहास रचला. मध्य प्रदेश संघाने रविवारी या मैदानावर देशतील प्रतिष्ठित रणजी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. मध्य प्रदेश संघाने पहिल्यांदाच या ट्राॅफीवर नाव कोरले. मध्य प्रदेश संघाने फायनलमध्ये ४१ वेळच्या चॅम्पियन आणि सर्वात यशस्वी मानल्या जाणाऱ्या मुंबई संघाला धूळ चारली. मध्य प्रदेश टीमने ६ गड्यांनी अंतिम सामना जिंकून इतिहास रचला. मुंबईचा दुसरा डाव २६९ धावांवर गुंडाळला गेला. त्यामुळे विजयासाठी मिळालेले १०८ धावांचे आवाक्यातले आव्हान मध्य प्रदेश संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात यशस्वीपणे गाठले.

टॉप रन स्कोअरर व विकेट-टेकरमध्ये मप्रचा दबदबा
टाॅप-५ सुपर फलंदाज

फलंदाज संघ धावा
सरफराज मुंबई 982
रजत पाटीदार मप्र 658
चेतन बिष्ट नागालँड 623
यश दुबे मप्र 614
शुभम शर्मा मप्र 608

टाॅप-५ सुपर गाेलंदाज
गाेलंदाज संघ विकेट

शम्स मुलाणी मुंबई 45 कार्तिकेय मप्र 32 शाहबाज नदीम झारखंड 25 गौरव यादव मप्र 23 सत्यजित महाराष्ट्र 21

06 वा किताब कोचच्या भुमिकेत पंडित यांनी पटकावला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई संघाने तीन, विदर्भ संघाने दोन आणि आता मध्य प्रदेशने पहिल्यांदा किताब पटकावला.

२३ वर्षांपूर्वी अपयशी, आता तिसऱ्याच दिवशी जेतेपद निश्चित

प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना १९९९ पासून मनात असलेली अपयशाची खंत आता सोनेरी यशाने पुसून टाकता आली. मध्य प्रदेश संघाबराेबरच कोच पंडित यांच्यासाठी हे विजेतेपद महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण, १९९९ मध्ये तत्कालीन कर्णधार पंडित यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश संघाला फायनलमध्ये कर्नाटकविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. यादरम्यान अवघ्या १५ मिनिटांत संघाच्या हातून विजय निसटला होता. मात्र, याच पराभवाच्या जुन्या कटू आठवणींना पुसून टाकण्यासाठी कोच पंडित यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच मध्य प्रदेश संघाला पहिल्यांदा चॅम्पियन होण्याची एेतिहासिक कामगिरी नाेेंद करता आली. यासाठी पंडित यांच्या मार्गदर्शनातून मध्य प्रदेश संघाने तिसऱ्याच दिवशी आपले विजेतेपद निश्चित केले. कोच पंडित यांनी खास डावपेच आखून बलाढ्य मानल्या जाणाऱ्या मुंबई संघाविरुद्ध फायनलमध्ये फक्त चार गाेलंदाजांनाच मैदानावर उतरवले होते. हा मोठा धाेका मानला जात होता. मात्र, कोचने दाखवलेला विश्वास सार्थकी लावताना गाैरव यादव, पार्थ, कुमार कार्तिकेयने आपली क्षमता सिद्ध केली.