आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना कुणाचाही असो, आरसीबी-आरसीबीचा जल्लोष एेकू येतो. बुधवारीदेखील असेच घडले. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यादरम्यान मुंबई व मध्य प्रदेश संघ जेव्हा मैदानावर उतरले, तेव्हा चाहत्यांनी त्याचे स्वागत आरसीबी-आरसीबी अशा आवाजाने केले. कारण, हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे घरचे मैदान आहे. अंतिम सामन्याचा पहिला दिवस अपेक्षेप्रमाणे राहिला. सुरुवातीला फलंदाजींनी वर्चस्व राखले, त्यानंतर गोलंदाजांनी. मुंबईने ५ बाद २४८ धावा काढल्या.
गत २३ वर्षांत देशातर्गत क्रिकेटमधील आपला सर्वात मोठा सामना खेळत असलेल्या मध्य प्रदेशची सुरुवात खराब झाली. त्यानंतर मप्रने सामन्यावर पकड घेत धोकादायक ठरू पाहणाऱ्या यशस्वी जैस्वालला सलग चौथ्या प्रथम श्रेणीतील शतकापासून रोखले. येथूनच सामना पलटला. विजेतेपदाच्या सामन्यातील पहिल्या दिवशी मजबूत फलंदाजी असलेल्या मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
संघाच्या दोन सलामीवीरांनी पृथ्वी शॉ (४७) व यशस्वीने पहिल्या गड्यासाठी ८७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान मध्यमगती वेगवान गोलंदाज अनुभव अग्रवालने पृथ्वीला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. संघाच्या डावात आणखी ३३ धावा जमा झाल्यानंतर अरमान जाफरला (२६) कुमार कार्तिकेयने टिपले. पदार्पणात शतक करणारा सुवेद पारकरला सारांश जैनने १८ धावांवर बाद केले. मुंबई आपली चांगली सुरुवात कायम ठेवू शकला नाही, ठराविक अंतराने त्यांनी गडी गमावले. यशस्वीनेे १६३ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचत सर्वाधिक ७८ धावा काढल्या, त्याला अग्रवालने बाद केले. दिवसअखेर सरफराज खान ४० व शम्स मुलानी १२ धावांवर खेळत आहेत.
३ शतके व दोन अर्धशतके करणाऱ्या सरफराजवर लक्ष
सध्या खेळपट्टीवर सरफराज खान टिकून आहे. त्याने यंदाच्या सत्रात ३ शतके व २ अर्धशतकांच्या मदतीने ८०३ धावा केल्या आहेत. जर तो मैदानावर टिकला तर मुंबई दुसऱ्या दिवशी ५५० धावा करू शकते. अशात मप्रवर दबाव वाढू शकतो. अशात मप्र सरफराजला सकाळच्या सत्रात बाद करण्याचा प्रयत्न करेल. तसे झाल्यास मुंबईवर दबाव वाढेल.
>धावफलक
मुंबईने नाणेफेक जिंकली (फलंदाजी)
मुंबई धावा चेंडू 4/6
पृथ्वी त्रि. गो. अनुभव अग्रवाल 47 79 5/1
यशस्वी झे. यश गो. अनुभव 78 163 7/1
अरमान झे. यश गो. अनुभव 26 56 3/0
सुवेद झे. आदित्य गो. सारांश 18 30 2/0
सरफराज खान नाबाद 40 125 3/0
हार्दिक झे. रजत गो. सारांश 24 44 3/0
शम्स मुलानी नाबाद 12 43 1/0
अतिरिक्त: 3. एकूण: 248/5. गडी बाद : 1-87, 2-120, 3-147, 4-185, 5-228. गोलंदाजी: कार्तिकेय 31-6-91-1, अग्रवाल 19-3-56-2, सारांश जैन 17-2-31-2, गौरव यादव 23-5-68-0.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.