आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Madhya Pradesh Union In Trouble; Madhya Pradesh Set A Target Of 437 Runs For Victory

यशस्वीचे दुसरे शतक:मध्य प्रदेश संघ अडचणीत ; विजयासाठी मध्य प्रदेश संघाला 437 धावांचे लक्ष्य

ग्वाल्हेर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशस्वी जायस्वालने आपली लय कायम ठेवताना दुसऱ्या डावात शतकी खेळी करत शेष भारताचा विजयाचा दावा मजबूत केला. याच खेळीच्या बळावर मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखााली शेष भारत संघाने शनिवारी इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत मध्य प्रदेश संघाला विजयासाठी ४३७ धावांचे खडतर टार्गेट दिले. शेष भारत संघाने दुसऱ्या डावात २४६ धावा केल्या. यादरम्यान यशस्वीने एकाकी झंुज देताना १४४ धावांची खेळी केली. आता खडतर लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य प्रदेश संघाची निराशाजनक सुरुवात झाली. संघाचा सलामीवीर अरहम शून्यावर बाद झाला. त्यामुळे संघाला दुसऱ्या डावात दिवसअखेर २ बाद ८१ धावा काढता आल्या. अद्याप ३५६ धावांनी पिछाडीवर असलेल्या मध्य प्रदेश संघाचा कर्णधार हिमांशू (५१) आणि हर्ष गवळी (१५) मैदानावर कायम आहेत.

बातम्या आणखी आहेत...