आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमार खेळीमुळे अडचणीत:माद्रिदचा तीन सामन्यांत दुसरा पराभव

माद्रिद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

| सुमार खेळीमुळे अडचणीत सापडलेल्या रिअल माद्रिद फुटबाॅल क्लबला आता ला लीगामध्ये तीन सामन्यांत दुसऱ्या पराभवाला सामाेेरे जावे लागले. पाहुण्या व्हिलारियलने सामन्यात यजमान माद्रिदला धूळ चारली. व्हिलारियलने ३-२ ने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्यामुळे माद्रिदच्या नावे तीन सामन्यांत दुसऱ्या पराभवाची नाेंद झाली आहे. तसेच माद्रिदचा यंदाच्या सत्रात २८ सामन्यांत हा पाचवा पराभव ठरला आहे. या पराभवामुळे आता माद्रिद क्लबच्या किताब जिंकण्याच्या मार्गात अडसर निर्माण झाला. आता या क्लबचे १० सामने उरले आहेत. यात दर्जेदार खेळी करत माद्रिदला विजय संपादन करावा लागणार आहे.