आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:गुजरातला हरवत महाराष्ट्र ईपीएफओ संघ विजेता

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरओ औरंगाबादच्या वतीने आयोजित ईपीएफओ पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र ईपीएफओ संघाने विजेेतेपद पटकावले. गरवारे क्रीडा संकुलावर झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गुजरात ईपीएफओ संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. या विपुल भन्साळी सामनावीर ठरला.

प्रथम खेळताना गुजरातने २० षटकांत ९ बाद ११३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने १३.३ षटकांत २ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात विपुल भन्साळीने अर्धशतक झळकवले. त्याने ४१ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ६५ धावांची विजयी खेळी केली. गुजरातच्या विवेक क्रिस्टाचारीने एकमेव गडी बाद केला. तत्पूर्वी गुजरातकडून सलामीवीर नरेंद्रने ४० चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ४३ धावा काढल्या. महाराष्ट्राकडून औरंगाबादचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सूरज वासनिकने ४ षटकांत २३ धावा देत ४ गडी बाद केले. उल्हास चोरगेने २ व कर्णधार अमित तावडेने एक गडी टिपला.

अमित तावडे मालिकावीर स्पर्धेच स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा महाराष्ट्राचा कर्णधार अमित तावडे मालिकावीर ठरला. अर्धशतक ठोकणारा विपुल भन्साळी सामनावीर ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघाला रणजीपटू अनंत नेरळकर व संजय मोडक यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रादेशिक पीएफ आयुक्त जगदीश तांबे, रमेशकुमार, आर.पी.राजदेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वी संघाचे नितीन इंगोले, नागेश येरेलू, नीलेश महिरे, सुनील पणीकर, ज्ञानेश्वर भोगील, अरुणा गौरव आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...