आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुचबिहार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा:आजपासून सोलापुरात महाराष्ट्र-सिक्कीम सामना, यजमान संघ सज्ज

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर शनिवारपासून १९ वर्षांखालील कुचबिहार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्र-सिक्कीम हा सामना शनिवारपासून चार दिवस रंगणार आहे. सकाळी ८:३० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नाणेफेक करण्यात येईल. या सामन्यादरम्यान पश्चिम बंगालचे सत्यजित लहरी व पंजाबचे रोहित सिंगला हे पंच असतील. संपूर्ण सामन्याचे पंच म्हणून हैदराबादचे अर्जुन यादव काम पाहतील.

सचिन धस विरुद्ध तरुण शर्मा सचिन महाराष्ट्राचे, तर तरुण शर्मा सिक्कीमचे नेतृत्व करीत आहे. सोलापूरचे आर्शिन व यश बोरामणी यजमान संघात आहेत. हा सामना प्रेक्षकांना पाहण्यासाठी मोफत आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन रणजितसिंह मोहिते यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...