आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया यूथ गेम्स:महाराष्ट्र संघ चॅम्पियन! मल्लखांब, ज्युदाेमध्ये सोनेरी यश संपादन

पंचकुला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा राष्ट्रीय खेळाडू मृगांक पठारेसह अवधून पिंगळे, ऋषभ गुगळे, अथर्व काेंडविलकर, चेतन मानकर आणि अमेय सूर्यवंशीने आपल्या चित्तथरारक कसरतीच्या बळावर महाराष्ट्र संघाला खेलो इंडिया यूथ गेम्सच्या मल्लखांब प्रकारात चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवून दिला. महाराष्ट्र संघाने यंदा नव्याने समावेश करण्यात आलेल्या मल्लखांब खेळ प्रकारात सोनेरी यश संपादन केेले. महाराष्ट्राने पदार्पणात यामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र पुरुष संघाला किताबाचा बहुमान मिळाला. महिला संघ या खेळ प्रकारात उपविजेता ठरला. महाराष्ट्र संघाने या खेळात आपला दबदबा कायम ठेवताना मध्य प्रदेशसह छत्तीसगड टीमला मागे टाकत सोनेरी यशाचा पल्ला यशस्वीपणे गाठला. त्यामुळे महाराष्ट्र पुरुष संघाला सुवर्णपदकाने गाैरवण्यात आले.

महाराष्ट्राचा दबदबा; मृगांकचे बोंड नटराजासान ठरले लक्षवेधी
महाराष्ट्र संघाने मल्लखांबमध्ये दबदबा कायम ठेवला. संघाला मध्य प्रदेश व छत्तीसगडकडून कडवे आव्हान मिळाले. ०.५ गुणांनी महाराष्ट्राचा संघ विजेता ठरला. महाराष्ट्राच्या विजेत्या संघाला १२६.४५ गुण मिळाले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मध्य प्रदेशने १२६.४० गुणांपर्यंत कडवी झुंज दिली.

रोप, पोल, हँगिंग प्रकारात कसरती या संघामध्ये अवधूत पिंगळे (मुंबई), ऋषभ गुगळे (मुंबई), अथर्व कोंडविलकर (मुंबई), चेतन मानकर (नाशिक), मृगांक पठारे (मुंबई), अमेय सूर्यवंशी (पुणे) यांचा समावेश होता. (शनिवारी मल्लखांबचे वैयक्तिक क्रीडा प्रकार होणार आहेत, अशी माहिती प्रशिक्षक अनिल नागपुरे यांनी दिली.

खो-खो : रामजी, जान्हवीच्या नेतृत्वात विजयी; यजमान संघांना फॉलोऑन
रामजी कश्यप आणि जान्हवी पेठेच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खाे-खाे संघांनी चाैथ्या सत्राच्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये दुसऱ्या विजयाची नाेेंद केली. महाराष्ट्र संघांनी दुसऱ्या दिवशीही विजयी मोहीम कायम ठेवली. पुुरुष संघाने दुसऱ्या सामन्यात शुक्रवारी यजमान हरियाणाचा पराभव केला. महाराष्ट्र संघाने हरियाणावर एकतर्फी (एक डाव ४ गुण) मात केली. नंतर मुलींनीही डावाने (एक डाव १ गुण) विजय संपादन केला. दोन्ही संघांकडून यजमान हरियाणाला फॉलोऑन मिळाला. मुलींच्या संघानेही यजमान हरियाणाच्या संघाला चांगलेच घायाळ केले. सुरुवातीला हरियाणाने निकराची लढत देण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराष्ट्राच्या मुलींनी आक्रमण तीव्र करत त्यांचे ११ गडी बाद केले. फॉलोऑनची नामुष्की ओढवलेला हरियाणा पिछाडीवर गेला. दोन्ही डावांत अवघे १० गडी बाद करता आले. अश्विनी शिंदेने दोन मिनिटे, जान्हवी पेठेने २ मिनिटे, संपदाने दीड मिनिट नाबाद व दुसऱ्या डावात २ मिनिट ४० सेकंद संरक्षण केले. आक्रमणात अश्विनी शिंदे, संपदा मोरे व ऋषालीने प्रत्येक दोन-दोन गडी बाद केले. दीपाली व जान्हवीने चांगला खेळ केला.

महाराष्ट्र एक डाव ४ गुणांनी विजयी
महाराष्ट्र पुरुष संघाने आक्रमण करीत हरियाणाचे तब्बल १५ गडी बाद केले. सुफियान शेखने आणि रोहन कोरे यांनी हरियाणाची सुरुवातीची फळी कापून काढली. दोघांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. पहिल्या डावात महाराष्ट्राचे केवळ ४ गडी बाद करता आले. दुसऱ्या डावात त्यांनी आक्रमणाची धार वाढवली होती. त्यामुळे सात गड्यांपर्यंतच त्यांचा स्कोअर गेला. दोन्ही डावांत मिळून त्यांना ११ गडी बाद करता आले. परिणामी महाराष्ट्राचा संघ एक डाव ४ गुणांनी विजयी ठरला. किरण वसावे याने २ मिनिट ३० सेकंद संरक्षण करत किल्ला लढवला. नरेंद्र कातकडेनेही २ मिनिटे बाजू लावून धरली. आदित्य कुदळे १ मिनिट आणि १० सेकंद संरक्षणाची धुरा सांभाळत नाबाद राहिला.

ज्युदाे : मिथिला भाेसलेने पटकावले सुवर्णपदक
आंतरराष्ट्रीय खेळाडू मिथिला भाेसलेने शुक्रवारी महाराष्ट्र संघाला ज्युदाे खेळ प्रकारात सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला. तिने ४० किलो वजन गटात सुवर्ण कामगिरी केली. तिने या गटाच्या फायनलमध्ये गुजरातच्या अर्चना नागेराला पराभूत केले. यासह ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली.

बातम्या आणखी आहेत...